Amravati Crime: अफाक हा सोशल मीडियावर रील तयार करीत होता. तो शहरातील एका युवतीच्या संपर्कात होता आणि त्यातूनच हे हत्याकांड घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पोलिसांनी याप्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेतले असून त्यापैकी तिघे अल्पवयीन आहेत. या थरारक हत्याकांडामुळे अमरावती शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या भीषण हत्याकांडामागे प्रेमप्रकरण आणि सोशल मीडियावरील वाद असल्याचे उघड झाले आहे.
NCP नेते फडणवीसांना ‘वर्षा’वर भेटले, पण पार्थ-सुनेत्रा पवारांना कल्पनाही नव्हती; तटकरेंना ‘देवगिरी’वर बोलावणं, गैरसमजाचं कारण
मृतक शेख अफाक आणि आरोपींमध्ये गेल्या काही दिवसांपासून एका प्रेमप्रकरणावरून तसेच इन्स्टाग्रामवरील चॅटिंगवरून तीव्र वाद सुरू होता. हाच वाद सामोपचाराने मिटवण्यासाठी दोन्ही गट सकाळी राजेंद्र कॉलनी परिसरातील एका कॅफेसमोर एकत्र आले होते. चर्चा सुरू असतानाच दोन्ही बाजूंचे नियंत्रण सुटले आणि वाद टोकाला गेला. शाब्दिक चकमकीचे रूपांतर अचानक रक्तरंजित हल्ल्यात झाले.
दिवसाढवळ्या शेख अफाक शेख अकिल याची घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील तीन आरोपी हे अल्पवयीन आहेत.
घटनाक्रम परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाला असून त्यात अफाक तेथे येण्यापूर्वी एक तरुणी आरोपी तरुणांसह गप्पा मारीत असल्याचे दिसून येत आहे. अफाकच्या मृत्यूची बातमी पसरताच ताज कॉलनी परिसरातील नागरिकांनी आणि नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केल्याने काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
Pune Crime: पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाने जीवन संपवलं; व्हिडिओमध्ये रवींद्र धंगेकरांसह अनेक बड्या राजकीय नेत्यांची नावं घेतली!
हाताचा पंजा तुटला
सहा ते सात हल्लेखोरांनी अफाकवर कोयता आणि चाकूने जीवघेणा हल्ला चढवला. हा हल्ला इतका भीषण होता की, कोयत्याच्या पहिल्याच वाराने अफाकच्या हाताचा पंजा मनगटापासून वेगळा होऊन जमिनीवर पडला. यावेळी गंभीर अवस्थेतही अफाकने जीव वाचवण्यासाठी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोरांनी पाठलाग करून त्याला गाठले. त्याच्या चेहऱ्यावर, गळ्यावर आणि शरीरावर चाकूने सपासप वार केले. अफाक रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर आरोपी दुचाकीने घटनास्थळावरून फरार झाले. अफाकला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

