Headlines

Tukaram Mundhe Lead FDA Raid in Jogeshwari Shop And Seized 11 lakh worth of unlabelled toilet soaps


अन्न आणि औषध प्रशासनाने मुंबईत मोठी कारवाई केली आहे. जोगेश्वरी पश्चिमेत असणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांच्या दुकानावर एफडीएने धाड टाकली. या धाडीत जवळपास 11 लाखांचे टॉयलेट साबण जप्त करण्यात आले आहेत.

Tukaram Mundhe Action
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात राज्यभरात धाडसत्र सुरु आहे. राज्यातील विविध हॉटेल्स, दूध संकलन केंद्र, औषध कंपन्या किंवा मेडिकल शॉप्स, मसाल्याची दुकानं ते सौंदर्य प्रसादनांची आस्थापनं या सर्वच ठिकाणी तुकाराम मुंढे यांच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जात आहे. मुंबईत नुकत्याच तीन दिवसांपूर्वी नामांकीत तीन हॉटेल्सचे थेट परवाना निलंबित करण्याची कारवाई तुकाराम मुंढे यांनी केली होती. हॉस्पिटल्समधील अस्वच्छता आणि इतर कारणांमुळे थेट परवाना निलंबित करण्याची कारवाई या तीनही नामांकीत हॉटेल्सवर करण्यात आली. यानंतर आता मुंबईतच आणखी मोठी कारवाई करण्यात आली आहे.

अन्न आणि औषध प्रशासनाने मुंबईतील जोगेश्वरीत एका सौंदर्य प्रसाधनांच्या दुकानावर अचानक धाड टाकली. यावेळी अधिकाऱ्यांनी दुकानातील सर्व वस्तूंची तपासणी केली. या तपासणीत अधिकाऱ्यांना काही त्रुटी आढळल्या. या त्रुटींची गंभीर दखल घेत अधिकाऱ्यांनी तब्बल 10 लाख 93 हजार 692 किंमतीचे विनालेबल टॉयलेट साबण जप्त केले आहेत. अधिकाऱ्यांना या दुकानात आवश्यक लेबल माहितीशिवाय विक्रीसाठी ठेवलेला माल आढळला. त्यामुळे अधिकाऱ्यांनी या प्रकरणी मोठी कारवाई केली.

कारवाईत अधिकाऱ्यांना नेमकं काय आढळलं?

अन्न आणि औषध प्रशासनाकडून प्रसिद्धी पत्रक जारी करुन या कारवाईबाबत माहिती देण्यात आली आहे. एफडीएने 14 जुलैला जोगेश्वरी पश्चिमेतील जे. के. सोप बाजार या दुकानावर छापा टाकला. यावेळी संबंधित आस्थापनामध्ये विनालेबल (Unlabelled) टॉयलेट साबण साठवून विक्रीसाठी ठेवलेला असल्याचे निदर्शनास आले. जप्त करण्यात आलेल्या साबणांवर बॅच/लॉट क्रमांक, उत्पादन दिनांक, वापरण्याची अंतिम मुदत (Use Before), उत्पादन परवाना क्रमांक तसेच उत्पादकाचे नाव व पत्ता यांसारखी कायद्याने आवश्यक असलेली माहिती नमूद करण्यात आलेली नव्हती.

टॉयलेट साबणाचे नमुने चाचणीसाठी घेतले

अशा प्रकारे आवश्यक लेबलिंगविना प्रसाधनांची विक्री करणे हे कायद्याचे उल्लंघन आहे. या कारवाईत अंदाजे 10,93,692 किंमतीचा टॉयलेट साबण जप्त करण्यात आला. पुढील तपासासाठी टॉयलेट साबणाचे दोन नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत. या प्रकरणी नबी उल्लाह नावाच्या व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही केली जात असल्याची माहिती एफडीएने दिली आहे.

टॉयलेट साबण म्हणजे काय?

टॉयलेट साबण म्हणजे वैयक्तिक स्वच्छतेसाठी जसे की शरीर, हात, पाय आणि चेहरा यांच्यासाठी वापरला जाणारा साबण. खरंतर टॉयलेट हा आज इंग्रजी शब्द असला तरी तो मूळ फ्रेंच भाषेतला आहे. फ्रेंचमध्ये त्याचा अर्थ स्वत:ला स्वच्छ करणे किंवा नटणे आणि थटणे असा होतो. त्याचा अर्थ कमोड किंवा शौचास जाणे असा होत नाही.

तुकाराम मुंढे यांनी काय प्रतिक्रिया दिली?

या कारवाईवर एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अन्न व औषध प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण हे आहे. कोणतेही सौंदर्य प्रसाधन उत्पादन कायद्यानुसार आवश्यक असलेल्या लेबलिंगशिवाय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. अशा उत्पादनांचा स्रोत, गुणवत्ता आणि सुरक्षितता पडताळणे कठीण होते. त्यामुळे अशा नियमभंग करणाऱ्या उत्पादक, वितरक आणि विक्रेत्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल”, अशी प्रतिक्रिया तुकाराम मुंढे यांनी दिली आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा