Amravati Theft News: वसाहतीतील अनेक रहिवासी बाहेरगावी गेल्याने कुलूपबंद घरांची रेकी करण्यात आली असावी, असा संशय व्यक्त होत आहे.

कांतानगर परिसरात असलेल्या या वसाहतीमधील ‘नल दमयंती’ या नव्या इमारतीमध्ये तीन न्यायाधीशांची घरे फोडण्यात आली, तर शेजारच्या ‘पैनगंगा’ सदनिकेतील दोन न्यायाधीशांच्या घरांतही चोरी झाली. याच परिसरातील न्यायालयीन कर्मचारी वसाहतीतील तीन इमारतींमधील चार घरांत चोरी झाली. शनिवार-रविवार सलग सुट्टीचा गैरफायदा घेऊन, चोरट्यांनी डाव साधला.
Crime News: महाशिवरात्रीलाच धक्कादायक घटना; घरी आलेल्या भिक्षेकरी महिलांना चिमुकलीने खिचडी दिली, नंतर मुलीसोबत भयावह प्रकार
पहाटेच्या सुमारास हा प्रकार उघड झाला पोलिस यंत्रणा तत्काळ सावध झाली. पोलिस आयुक्त राकेश ओला व उपायुक्त गणेश शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक पथकानेही पाहणी करून, पुरावे गोळा केले. सकाळी आठपर्यंत प्रत्येक घराची तपासणी करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे मागील झुडपांच्या बाजूने भिंत ओलांडून पळताना दिसत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
न्यायालयीन कर्मचारी आशिष गेडाम अकोल्यात वास्तुशांतीसाठी गेले असताना त्यांच्या घराचे कुलूप तोडण्यात आले. बेडरूममधील कपाट फोडून तिजोरीतील सोन्या-चांदीचे दागिने व काही रोख रक्कम लंपास करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध सुरू आहे.
Nashik Crime: परीक्षेला जाताना विद्यार्थिनीचा विनयभंग; नाशकात रोडरोमियोचा संतापजनक प्रकार, भररस्त्यात छेडछाड
बच्चू कडू यांची टीका
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी या घटनेवरून राज्य सरकारवर तीव्र टीका केली. ‘न्याय देणाऱ्यांच्याच घरात चोरी होत असेल, तर सर्वसामान्यांचे काय,’ असा सवाल करत कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. गृहखाते मुख्यमंत्र्यांकडे असताना गुन्हेगार मोकाट फिरत असल्याचा आरोप त्यांनी केला.

