Amravati Girls Assault Case : सुरुवातीला पीडितांच्या सुरक्षिततेमुळे कोणीही समोर येण्यास धजावत नव्हते, परंतु प्रकरणाचे गांभीर्य ओळखून ग्रामीण पोलिसांनी स्वत:हून फिर्यादी होत गुन्हा दाखल केला
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, अमरावती : अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरांसह संपूर्ण अमरावती जिल्हा हादरवून सोडणाऱ्या आक्षेपार्ह व्हिडीओ आणि लैंगिक शोषण प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर याला बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने आरोपीला २१ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
तरुणींचे व्हिडिओ व्हायरल
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर काही तरुणींचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाले होते. या माध्यमातून मुलींचे लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलिंग होत असल्याचे समोर आले होते. हे प्रकरण समोर येताच परिसरात संतापाची लाट उसळली. सुरुवातीला पीडितांच्या सुरक्षिततेमुळे कोणीही समोर येण्यास धजावत नव्हते, मात्र प्रकरणाचे गांभीर्य ओळखून ग्रामीण पोलिसांनी स्वत:हून फिर्यादी होत गुन्हा दाखल केला आणि रात्रीतून कारवाई करत मुख्य आरोपीला जेरबंद केले.
१८० मुलींचे ३५० आक्षेपार्ह व्हिडिओ
खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी यामागे एक मोठी संघटित टोळी कार्यरत असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. मोहम्मद अयान आणि मोहम्मद झोयान या तरुणांनी १८० हून अधिक मुलींचे सुमारे ३५० आक्षेपार्ह व्हिडीओ तयार केले असून, या माध्यमातून मुलींना देह व्यापारासाठी धमकावले जात असल्याचा दावा बोंडे यांनी केला आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन करून आरोपींवर मकोका लावण्याची मागणीही त्यांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे. Solapur Crime : मी आणि सोनाली काल रात्री झोपलो, आता ती उठत नाहीये; जावयाचा घाबराघुबरा फोन; सासऱ्यांना संशय येताच मोठा ट्विस्ट
‘दोषींना कठोर शिक्षा होणार’
परतवाड्यातील महिला अत्याचार प्रकरण अत्यंत गंभीर असून त्यातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा दिली जाणार, अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. बावनकुळे म्हणाले, हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांशी तातडीने चर्चा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची दखल घेतली आहे. लोकप्रतिनिधींनी पुरावे पोलिसांकडे सादर केले असून सखोल चौकशी सुरू आहे.
हा अत्यंत संवेदनशील आणि गंभीर विषय असून, सरकार याकडे पूर्ण गांभीर्याने पाहत असल्याचेही त्यांनी सांगितले. खासदार प्रणिती शिंदे यांच्या आरोपांवर बोलताना त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात खरातबाबत संपूर्ण वस्तुस्थिती मांडली आहे. कोणाकडेही पुरावे असतील तर ते एसआयटीकडे द्यावेत. विनाकारण आरोप करून चौकशी भरकटवण्याचा प्रयत्न योग्य नाही, असेही बावनकुळे यांनी सांगितले. Snake Bite : जिन्यात मृत्यू दबा धरुन बसलेला! खेळता-खेळता शंभू रडू लागला, प्रकृती बिघडताच डॉक्टरांकडे नेलं, पण दांडगे कुटुंबावर काळाने घाव घातलाच ग्रामीण पोलिस दलाने या प्रकरणाचा अत्यंत संवेदनशीलतेने तपास सुरू केला आहे. साध्या वेशातील महिला पोलिस पथके पीडितांच्या मदतीसाठी तैनात असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘पीडित तरुणींची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल. पीडितेची कोणतीही चूक नाही, त्यांना मानसिक आधार देणे गरजेचे आहे’, असे पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी स्पष्ट केले आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा