Amol mitkari accusations on ajit pawar plane crash in baramati; अजित पवारांच्या अपघाताबाबत अमोल मिटकरींकडून आरोपांचा नवा बॉम्ब; पायलटवर थेट ‘सुसाईड मिशन’चा आरोप
Amol mitkari accusations on ajit pawar plane crash in baramati; अजित पवारांच्या अपघाताबाबत अमोल मिटकरींकडून आरोपांचा नवा बॉम्ब; पायलटवर थेट ‘सुसाईड मिशन’चा आरोप
प्रियंका जाधव, अकोला: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला एक महिना पूर्ण होत असतानाच या प्रकरणाला आता अत्यंत गंभीर वळण मिळालं आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी या विमान दुर्घटनेबाबत धक्कादायक प्रश्न उपस्थित केले आहेत. हा केवळ अपघात नसून घातपाताचा प्रयत्न असावा, असा संशय व्यक्त केला असून हा प्रकार एखाद्या सुसाईड मिशनसारखा वाटत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मिटकरी यांच्या या विधानाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
अमोल मिटकरी यांनी या दुर्घटनेतील वैमानिकाच्या चारित्र्यावर आणि भूतकाळाचा उल्लेख करत म्हटलं आहे की, “संबंधित वैमानिक कपूर याची पार्श्वभूमी संशयास्पद आहे. त्याची ‘ड्रंक हिस्ट्री’ असून अशा व्यक्तीच्या हातात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांच्या विमानाची सूत्रे कशी देण्यात आली?” असा सवाल अमोल मिटकरींनी विचारला. तसंच हा संपूर्ण प्रकार एखाद्या सुसाईड मिशनसारखा वाटत असल्याचंही ते म्हणाले.
मिटकरी यांनी यावेळी डीजीसीएच्या प्राथमिक अहवालातील विसंगतीवर बोट ठेवलं आहे. त्यांनी दावा केला की, “डीजीसीएच्या अधिकृत कागदपत्रांनुसार विमानात एकूण सहा जण प्रवास करत असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. मात्र, नंतर घटनास्थळी केवळ पाचच मृतदेह सापडले. मग तो सहावा प्रवासी नक्की कोण होता आणि तो कुठे गायब झाला?” असा सवाल मिटकरी यांनी विचारला आहे.
राजीव गांधींच्या हत्येशी तुलना
अजित पवार यांच्या अपघाताबाबत शंका व्यक्त करताना अमोल मिटकरी यांनी देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येचा संदर्भ दिला. देशातील मोठ्या नेत्यांच्या सुरक्षेबाबत आणि अशा प्रकारच्या घातपातांबाबत जी साखळी असते, तसाच काहीसा प्रकार इथे घडला आहे का, अशी शंका त्यांनी उपस्थित केली.
दरम्यान, “महाराष्ट्राच्या जनतेला सत्य जाणून घेण्याचा अधिकार असून हा प्रकार अपघात होता की घातपात, याबाबत दूध का दूध आणि पाणी का पाणी झालेच पाहिजे. त्यामुळे या प्रकरणाची अत्यंत पारदर्शक आणि सखोल चौकशी राज्य आणि केंद्र सरकारने करावी,” अशी मागणी अमोल मिटकरींनी केली आहे. .
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा