Headlines

chandrapur crime liquor addict son kills mother after over cooking bitter gourd dispute; बायको नांदत नव्हती, आई सांभाळत होती; दारुडा मुलगा जन्मदात्या आईवर तुटून पडला, माऊलीनं जागेवर जीव सोडला, कारण फक्त….


चंद्रपुरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना: फक्त कारल्याची भाजी केली या शुल्लक कारणावरून दारूच्या नशेत असलेल्या जगदीश पेटकुले याने आपल्या ६५ वर्षीय आईची अमानुष मारहाण करून हत्या केली.

son killed mother over bitter gourd vegetable dispute.
चंद्रपुरात दारुड्या मुलाने कारल्याच्या भाजीच्या वादावरुन आईची हत्या केली.(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
चंद्रपूर: दारु पिल्यानंतर उद्भवलेल्या रागामध्ये जन्म दिलेल्या आईचा जीव घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने सध्या सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही संतापजनक घटना चंद्रपूरमधील डोंगरगावात घडली आहे. यावेळी आई आणि मुलामध्ये अत्यंत साधारण कारणावरुन भांडण झाले आणि या भांडणाचे रुपांतर भयावह शेवटात झाले आहे. त्यामुळे दारुचे व्यसन हा किती नुकसानकारक प्रकार ठरु शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

नेमकं काय घडलं?

याप्रकरणामध्ये घडलेला प्रकार पोलिसांनी सांगितला आहे. त्यानुसार आरोपीचे नाव हे जगदीश पेटकुले आहे. तो 36 वर्षांचा आहे. त्याची आई मृत सुमित्राबाई पेटकुले यांचा त्याने खून केला आहे. त्या 65 वर्षांच्या होत्या. स्वतः च्या आईला ज्या कारणाने जगदीशने संपवले ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. फक्त कारल्याची भाजी बनवली या गोष्टीवरुन हा वाद झाला. हाच वाद पुढे अत्यंत विकोपाला गेला आणि त्यातच जगदीशच्या हातून अनर्थ घडला.

पत्नी दोन महिने माहेरी राहत होती

पोलिसांनी दिलेल्या अधिकच्या माहितीनुसार आरोपी जगदीश याची पत्नी गेले दोन महिने ही त्याच्यापासून दूर राहत होती. त्याच्या दारूच्या व्यसनाला तिही कंटाळली होती. जगदीशला दोन मुलंही आहेत. मात्र पत्नी घरी नसताना आईसोबत राहणाऱ्या आरोपी जगदीशमने आईसोबत स्वयंपाकावरुन झालेल्या वादानंतर तिचा जीवच घेण्याच पाप केलं आहे. काल रात्री त्याच्या आईने स्वंयपाक केला होता. मात्र ताटात कारल्याची भाजी पाहून जगदीशच्या डोक्यात प्रचंड राग भरला आणि त्यातून दोघांमध्ये वाद सुरु झाला. हा वाद पुढे भीषण घटनेत संपला.

Maharashtra TimesBeed Crime: ‘साहेब 20 हजार घ्या…’; तहसीलदार व्यंकटेश मुंडे लाचखोरीच्या जाळ्यात; परळीत एसीबीचा मोठा दणका!

आईला अमानुष मारहाण

जगदीशला यावेळी राग एवढा अनावर झाला की त्याने स्वतःच्या जन्मदात्या आईला अमानुष अशा प्रकारची मारहाण केली. तिला डोक्याला आणि छाती व शरिराच्या इतर भागांनाही गंभीर दुखापत झाली त्यानंतर आईचा जागीच जीव गेला. यावेळी घराजवळील शेजाऱ्यांनी आरडाओरड केली मात्र काही उपयोग झाला नाही, तोपर्यंत सुमित्राबाई या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या.

Maharashtra TimesPune News : बारामतीत आता अतिरिक्त जिल्हाधिकारी, राज्य सरकारकडून प्रस्ताव मान्य, काय होणार बदल?

मुलाला अटक

संबंधित प्रकाराची माहिती पोलिसांना समजताच घटनास्थळावर जाऊन त्यांनी पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि आरोपी जददीश पेटकुले याला ताब्यात घेतलं.त्याच्यावर ह्त्येच्या गुन्हा नोंदवला आहे. प्राथमिक तपासाअंती आरोपी हा दारुच्या नशेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दारुच्या व्यसनामुळेच जगदीशने हे कृत्य केले असल्याचे नागरिकांनाही यावेळी सांगितले आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा