संगमनेर विधानसभा मतदारसंघाची २०२४ ची निवडणूक ही राज्यात गाजलेल्या निवडणुकांपैकी एक होती. संगमनेर मतदारसंघातून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना पराभूत करून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे अमोल खताळ विधानसभेत पोहोचले आणि जायंट किलर’ ठरले! पहिल्याच निवडणुकीत अमोल खताळ या नवख्या उमेदवारांना काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांना धोबीपछाड दिल्यानं अमोल खताळ चर्चेत आले. पण निकाल लागून आमदारकी मिळाल्यानंतर आता अमोल खताळ यांच्यावर आता कायदेशीर संकट ओढावलंय. खुद्द सुप्रीम कोर्टाने आमदार अमोल खताळ यांना मोठा धक्का दिलाय. त्यांच्या विरोधात हायकोर्टात चालणाऱ्या खटल्याला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने स्पष्ट नकार दिलाय. यामुळे आता खताळांविरोधात उच्च न्यायालयात रीतसर खटला चालणार आहे! पण हे प्रकरण नेमकं काय आहे? बाळासाहेब थोरातांनी काय आरोप केलेत? आणि या खटल्यामुळे अमोल खताळ यांची आमदारकी धोक्यात का आली आहे? तेच या व्हिडिओतून समजून घेऊया.