Headlines

पुण्यात डेंगळे पुलाखाली अडकलेल्या युवकाची सुटका:अग्निशमन दलाने वाढत्या पाण्याच्या प्रवाहात केले बचावकार्य




पुण्यातील डेंगळे पुलाखाली नदीच्या चेंबरवर अडकलेल्या एका २२ वर्षीय युवकाची अग्निशमन दलाच्या जवानांनी शुक्रवारी दुपारी सुखरूप सुटका केली. नदीतील पाण्याचा प्रवाह वाढत असतानाही जवानांनी तातडीने बचावकार्य राबवत अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत युवकाला सुरक्षित बाहेर काढले. अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला दुपारी २ वाजून २५ मिनिटांनी या घटनेची माहिती मिळाली. पुलाखाली मध्यभागी असलेल्या चेंबरवर एक युवक अडकला असून त्याला तातडीने मदतीची गरज असल्याचे कळवण्यात आले होते. यानंतर कसबा अग्निशमन केंद्राचे वाहन आणि जवान तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळी पोहोचल्यावर जवानांना युवक चेंबरवर अडकलेला दिसला. नदीतील पाण्याचा प्रवाह सातत्याने वाढत असल्याने, क्षणाचाही विलंब न करता जवानांनी दोरी, शिडी आणि लाइफ जॅकेटच्या मदतीने खाली उतरून बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर युवकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. संबंधित युवक पुलाखाली नेमका कसा आणि कोणत्या कारणामुळे गेला, याबाबतची माहिती त्याच्याकडून मिळू शकली नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. या बचावकार्यात वाहनचालक समीर शेख यांच्यासह जवान समित दळवी, गणेश लोणारे, राजेंद्र महाडीक, प्रसाद नाणेकर, संतोष अरगडे, प्रतीक कुंभार आणि आतिश नाईकनवरे यांचा सहभाग होता. जीवरक्षक राजू काची यांनीही या बचावकार्यात मोलाची मदत केली. तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांना मानद डॉक्टरेट कर्नाटकातील कलबुर्गी येथील श्री सत्यसाई युनिर्व्हसिटी फॉर ह्युमन एक्सलन्सकडून तालयोगी पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर यांना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि तालवाद्य कलेच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल संगीत आणि ललित कला क्षेत्रातील सन्माननिय डॉक्टरेट (मानद डी. लिट.) बहाल करण्यात आली.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत