Amalner Dhule Highway ST Bus Car Accident in Jalgaon Family killed Bike Rider Couple dies; दैवदुर्विलास! कारची बाईकला धडक, गाडीतील वरमाय-वरपित्याचा करुण अंत, तर लग्न ठरलेल्या दुचाकीस्वार युगुलाचाही एकत्रच शेवट
Amalner Dhule Highway ST Bus Car Accident in Jalgaon Family killed Bike Rider Couple dies; दैवदुर्विलास! कारची बाईकला धडक, गाडीतील वरमाय-वरपित्याचा करुण अंत, तर लग्न ठरलेल्या दुचाकीस्वार युगुलाचाही एकत्रच शेवट
Amalner Dhule Highway Car ST Bus Accident : अमळनेर-धुळे रस्त्यावरील मंगरूळनजीक सकाळी ७ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण तिहेरी अपघाताने या दोन्ही कुटुंबांच्या आनंदावर कायमचे विरजण घातले.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, जळगाव : घरात सनई-चौघड्यांचे सूर घुमणार होते, लग्नाची खरेदी झाली होती. एका बाजूला डॉ. नीलेश आणि सोनल नव्या संसाराची स्वप्ने पाहत अमळनेरकडून धुळ्याच्या दिशेने बाईकवर जात होते, तर दुसऱ्या बाजूला अवघ्या दहा दिवसांवर आलेल्या मुलाच्या लग्नाची पत्रिका नातेवाइकांना वाटण्यासाठी आणि चोपडा येथील भाच्याच्या अमळनेरला असलेल्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी महाजन कुटुंब व्याराहून (गुजरात) अमळनेरकडे आनंदाने येत होते. पण काळाला काही वेगळेच मंजूर होते.
व्यारा (गुजरात) येथील सुरेश विक्रम महाजन आणि अनिता महाजन यांच्या मुलाचे येत्या १९ जून रोजी लग्न ठरले होते. त्यातच त्यांच्या भाच्याचा साखरपुडा अमळनेर येथे आयोजित करण्यात आला होता. हा दुहेरी आनंद साजरा करण्यासाठी आणि साखरपुड्याचे निमित्त साधून नातेवाइकांना लग्नाची पहिली पत्रिका देण्यासाठी सुरेश महाजन, त्यांच्या पत्नी अनिता, चुलत भाऊ नंदलाल महाजन आणि भावजय निर्मला महाजन हे सर्वजण कारने निघाले होते. कार धुळ्याकडून अमळनेरकडे येत होती.
Uday Samant On Bacchu Kadu | CM Fadnavis यांच्यावर बच्चू कडूंच वक्तव्य,मंत्री सामंत थेटच बोलले
या अपघातात कारची ज्या दुचाकीला धडक बसली, त्यावरून पशुवैद्य नीलेश सुकदेव तावडे (वय २५, रा. मालपूर, ता. शिंदखेडा) आणि सोनल एकनाथ जावरे (वय २४, रा. सुरत, मूळ गाव धरणगाव) हे दोघे प्रवास करीत होते. त्यांचे लग्न ठरले होते. दोघेही भविष्याची स्वप्ने रंगवत, सुखाच्या गप्पा मारत अमळनेरकडून धुळ्याच्या दिशेने जात होते. पण समोरून येणाऱ्या महाजन कुटुंबाच्या कारने अमळनेर-चाळीसगाव बसला (क्र. एमएच १४, सीयू ७५४०) आणि नीलेशच्या दुचाकीला (क्र. एमएच १८, सी ८७१९) जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. नीलेश आणि सोनल या होणाऱ्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा