Headlines

China Plane Crash: चीनमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरसारखी घटना; बीजिंगच्या सर्वात उंच इमारतीवर विमान आदळलं; परिसरात खळबळ


China Plane Crash: चीनच्या राजधानीतील सर्वात उंच इमारतीवर एक विमान धडकलं आहे. या दुर्घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. विमान टॉवरवर आपटताच त्याचे तुकडे झाले.

china plane crash
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
बीजिंग: चीनची राजधानी बीजिंगमध्ये एक विमान शहरातील सर्वात उंच इमारतीला जाऊन धडकलं. या दुर्घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली. या अपघातातील मृतांचा, जखमींना नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाही. CITIC टॉवरला जाऊन विमान धडकलं. हा टॉवर चीनमध्ये जुन नावानंदेखील ओळखला जातो. हा टॉवर १०९ मजली आहे. दुर्घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. विमान टॉवरला धडकताच काचेच्या खिडक्या आणि विमानाचे तुकडे खाली पडले. विमानाचा मागील भाग विमानापासून वेगळा झाला.

घटनास्थळी असलेल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान इमारतीला धडकताच आसपासच्या परिसरात एकच खळबळ उडाली. इमारतीमधील लोकांना तातडीनं बाहेर काढण्यात आलं. घटनास्थळी शेकडो लोक जमा झाले. पुढच्या काही मिनिटांत अग्निशमन दल, पोलीस आणि रुग्णवाहिका दाखल झाल्या. इमारतीच्या आत मदत आणि बचाव कार्य अद्याप सुरू आहे. टॉवरच्या वरील मजल्यांवर अनेक जण अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Maharashtra TimesAsim Munir: भारताच्या कट्टर शत्रूला संपवण्यासाठी मोसादनं कट रचलेला, ठिकाणही ठरलेलं; ऐनवेळी काय घडलं?
सीएनएनच्या वृत्तानुसार, टॉवरला धडकलेलं विमान एक स्वदेशी हलकं स्पोर्ट विमान आहे. Sunward SA 60L Aurora असं या विमानाचं नाव आहे. विमानाच्या टेल नंबरवर याचा उल्लेख आहे. Flightradar24 वरील माहितीनुसार, दुर्घटनेवेळी विमान आपल्या ठरलेल्या मार्गापासून भरकटलेलं होतं.

चीननं बीजिंगच्या सुरक्षेसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. बऱ्याच महत्त्वाच्या उपाययोजना केल्या आहेत. १ मेपासून बीजिंग ड्रोनमुक्त शहर बनलं आहे. बीजिंगमध्ये राहणाऱ्या लोकांना सरकारच्या परवानगीशिवाय ड्रोन खरेदी करण्यास, ड्रोन भाड्यानं घेण्यास आणि ड्रोन उडवण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
Maharashtra TimesCrude Oil: होर्मुझ मार्ग खुला, खनिज तेलही स्वस्त; पण आता वेगळंच संकट; सामान्यांच्या खिशाला झळ
अपघातानं ९/११ हल्ल्याच्या आठवणी ताज्या
११ सप्टेंबर २००१ रोजी अल कायदाच्या दहशतवाद्यांनी अमेरिकेत आत्मघाती हल्ला घडवून आणला. या हल्ल्यात सहभागी असलेल्या १९ दहशतवाद्यांनी ४ विमानांचं अपहरण केलं. यातील २ विमानांनी न्यूयॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवर्सला धडक दिली. तिसरं विमान वर्जिनियातील आर्लिंगटन काऊंटी येथील अमेरिकन संरक्षण मुख्यालय पेंटागनवर कोसळलं. तर चौथं विमान पेन्सिल्वेनियाच्या एका ग्रामीण परिसरातील शेतात पडलं. या हल्ल्यांमध्ये १९ दहशतवादी आणि २,९७७ लोकांचा जीव गेला होता.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.आणखी वाचा