Headlines

Akola three children killed in a collision with an ashok leyland truck while heading out for holi shopping; होळीच्या सणाआधी खरेदीसाठी लहान मुलं घराबाहेर पडली, पण वाटेत भीषण अपघात


Bike Accident: दर्शन आणि साई हे दोन्ही सख्खे भाऊ असल्याची माहिती समोर आली असून, एकाच कुटुंबातील दोन चिमुरड्यांचा अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

akola accident
होळीच्या सणाआधी खरेदीसाठी लहान मुलं घराबाहेर पडली, पण वाटेत भीषण अपघात(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रियंका जाधव, अकोला: होळीच्या उत्साहाच्या वातावरणात अकोल्यात अतिशय हृदयद्रावक घटना घडली असून होळीसाठी बाजारात खरेदीसाठी जातानाच तीन चिमुरड्यांचा अपघातात मृत्यू झाल्याच्या बातमीने परिसरात शोककळा पसरली आहे. अकोल्यातील तेल्हारा शहराजवळील शेरी फाट्याजवळ रविवारी हा अपघात झाला. दुचाकी आणि आयशर ट्रकच्या भीषण धडकेतून हा अपघात झाला असून माळेगाव येथील तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे वैष्णव व आपतुरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, माळेगाव येथील तीन मुले दुचाकीने तेल्हारा शहराकडे होळीसाठी बाजार करायला जात होती. शेरी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या एका आयशर वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसऱ्या मुलाने रुग्णालयात नेताना वाटेतच प्राण सोडले.

मृतांची नावे:
१. दर्शन रामेश्वर वैष्णव (वय १६ वर्षे)
२. साई रामेश्वर वैष्णव (वय १२ वर्षे)
३. गणेश दीपक आपतुरकर (वय १६ वर्षे)

अपघातानंतर संबंधित आयशर वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले असून ते तेल्हारा पोलीस स्टेशनला नेण्यात आले आहे. तिन्ही मृतदेहांचे तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं असून, पोलीस या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करत आहेत. घटनेचा पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे. माळेगाव सारख्या छोट्या गावातून बाहेर पडलेल्या या तीन उमद्या मुलांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने ग्रामस्थांनी संताप आणि दुःख व्यक्त केले जात आहे, सणाच्या तोंडावर घडलेल्या या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात दुःखाचे सावट पसरले असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा