Headlines

Akola Patur Renuka Kekan Succeeds in Union Public Service Commission Exam; कष्टाच्या जोरावर UPSC मध्ये घवघवीत यश, तिसऱ्या प्रयत्नात झेंडा रोवला; अकोल्याच्या लेकीचा देशात डंका


Akola Renuka Kekan Success Story : नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (UPSC) निकाल जाहीर झाला आहे. यात महाराष्ट्राच्या अनेक मुलांनी यश संपादन केलं आहे.

Akola Renuka Kekan Success Story
रेणुका केकन केंद्रीय लोकसेवा आयोग निकाल(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रियंका जाधव, अकोला : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील ग्रामीण भागातील रेणुका दिनेश केकन हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत यश मिळवून आपल्या तालुक्याचा आणि जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे. जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर तिने हे शिखर गाठले असून, पातूर तालुक्यातून ‘यूपीएससी’ उत्तीर्ण होणारी ती पहिलीच विद्यार्थिनी ठरली आहे. रेणुकाचे प्राथमिक शिक्षण बोडखा येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर पातूर येथील तुलसाबाई कावल विद्यालयातून तिने पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. विशेष म्हणजे, बारावीच्या परीक्षेत ती अमरावती विभागातून प्रथम आली होती. उच्च शिक्षणासाठी तिने पुण्याचे फर्ग्युसन महाविद्यालय गाठले आणि तिथून इंग्रजी विषयात बीएची पदवी पूर्ण केली.

अपयशावर मात करत मिळवलं यश

पदवी पूर्ण झाल्यानंतर रेणुकाने पुण्यातच राहून यूपीएससीची तयारी सुरू केली. पहिल्या दोन प्रयत्नांत तिला यश मिळाले नाही. मात्र, खचून न जाता तिने तिसऱ्या प्रयत्नात पूर्ण ताकदीनिशी परीक्षा दिली आणि यश संपादन केले.
Maharashtra TimesWomen’s Day: भुयारी मेट्रोची कमान महिलांहाती! CSMT आणि मरोळ नाका स्थानकांची जबाबदारी; महिला दिनानिमित्त विशेष उपक्रम

कौटुंबिक पार्श्वभूमी

रेणुकाचे वडील दिनेश केकन हे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असून आई गृहिणी आहे. आपल्या मुलीच्या यशात कुटुंबाचा खंबीर पाठिंबा आणि गुरूंचे मार्गदर्शन मोलाचे ठरल्याचे रेणुकाने सांगितले. निकाल जाहीर होताच पुण्यात आणि तिच्या मूळ गावी जल्लोष करण्यात आला. तिच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण झाला आहे.
Maharashtra Timesखाद्यपदार्थांना महागाईची फोडणी? व्यावसायिक सिलिंडरच्याही किंमतींमध्ये वाढ झाल्याने झळ बसण्याची शक्यता

बापाच्या घामाचं चीज झालं!

ग्रामीण भागातील मातीचा सुगंध आणि कष्टाची ओढ असलेल्या एका तरुणाने देशातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या परीक्षेत आपल्या यशाचा झेंडा रोवला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर तालुक्यातील शंकरपूर येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाने यूपीएससी परीक्षेत 434वी रँक मिळवून प्रशासकीय सेवेचे आपले स्वप्न सत्यात उतरवले आहे. प्रज्वलचे हे यश म्हणजे केवळ एका तरुणाची प्रगती नसून, शेतात राबणाऱ्या एका बापाच्या कष्टाला मिळालेली ही सर्वात मोठी पावती आहे. प्रज्वल राजू पोळ असं यूपीएससी परीक्षेत 434वी रँक मिळवलेल्या तरुणाचे नाव आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा