Akola bjp forms alliance with sharad pawar ncp akola municipal councilors major setback for prakash Ambedkar; मोठा ट्विस्ट! शरद पवारांच्या नगरसेवकांनी अचानक भूमिका बदलल्याने महापौर भाजपचा होणार, प्रकाश आंबेडकरांना धक्का
Akola bjp forms alliance with sharad pawar ncp akola municipal councilors major setback for prakash Ambedkar; मोठा ट्विस्ट! शरद पवारांच्या नगरसेवकांनी अचानक भूमिका बदलल्याने महापौर भाजपचा होणार, प्रकाश आंबेडकरांना धक्का
NCP BJP News: महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजपने मित्रपक्षांसोबत ‘शहर सुधार आघाडी’ स्थापन केली असून, ४४ नगरसेवक सोबत असल्याचा दावा केला आहे. काँग्रेससह इतर पक्षांची आघाडी पद वाटपावरून एकमत न झाल्यामुळे अयशस्वी ठरली. अशातच पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्यामुळे भाजपची सत्ता जवळपास निश्चित झाली आहे.
मोठा ट्विस्ट! शरद पवारांच्या नगरसेवकांनी अचानक भूमिका बदलल्याने महापौर भाजपचा होणार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, अकोला: महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी सुरू असलेली राजकीय चढाओढ आता एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. निवडणुकीनंतर महानगरपालिकेत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने मित्र पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापनेसाठी दावा केला असून, महायुतीच्या नेतृत्वात ४४ नगरसेवकांची ‘शहर सुधार आघाडी’ स्थापन केली आहे. या गटाची नोंदणी शुक्रवारी संध्याकाळी अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात आल्याची माहिती आहे.
दुसरीकडे अकोल्यात भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी काँग्रेससह इतर समविचारी पक्ष एकत्र आले होते. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मात्र पद वाटपावरून एकमत न झाल्याने ही आघाडी किती तग धरेल हे सांगणे कठीण आहे. दोन दिवसांपूर्वी ॲड. आंबेडकर यांच्या निवासस्थानी काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना (उबाठा), वंचित बहुजन आघाडी व अपक्षांची एक संयुक्त बैठक झाली होती. या बैठकीनंतर त्याच दिवशी रात्री पुन्हा या सर्व पक्षांच्या नेत्यांची एक डिनर पार्टी झाली. यावेळी काँग्रेसने २१ नगरसेवक असतानाही आम्हाला कुठलेही पद नको अशी निर्णायक भूमिका घेतली होती. मात्र वंचित बहुजन आघाडी, शिवसेना (उबाठा) व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्यात पद वाटपावरून एकमत न झाल्याने ही आघाडी चर्चेपूर्तीच मर्यादित राहिली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे तीन नगरसेवक जे वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसच्या सभेला उपस्थित होते, ते आता भाजपसोबत हात मिळवणी करीत शहर सुधार आघाडीमध्ये सामील झाले आहेत. अकोला महानगरपालिकेच्या राजकारणात झालेल्या या प्रचंड उलथापालथीमुळे आता बहुमताची जुळवाजुळव होत असल्याने भाजपची सत्ता महानगरपालिकेत येणार हे जवळपास निश्चित झालेले आहे. ३० जानेवारीला महापौर, उपमहापौरपदाची निवड होईल. तत्पूर्वी पाच दिवसांत महापालिकेच्या राजकारणात काय घडामोडी घडतात, हे बघणे उत्सुकतेचे ठरेल.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा