Bollywood Actor : बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते अजित वच्छानी यांनी शाहीर साबळे यांच्या मुलीसोबत लग्न केलेलं. त्यांची मुलगीही लोकप्रिय अभिनेत्री आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी पडद्यावर मुख्य भूमिका न साकारताही प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण केली. अभिनेता अजित वच्छानी हे त्यापैकीच एक होते. आपल्या दमदार अभिनयामुळे त्यांनी १९८० आणि १९९०च्या दशकात हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये स्वतःचं स्थान मिळवलं.
मुंबईत १० ऑगस्ट १९५१ रोजी जन्मलेले अजित वच्छानी यांनी हिंदी मनोरंजनविश्वात अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. ‘मिस्टर इंडिया’, ‘मैंने प्यार किया’, ‘कभी हाँ कभी ना’, ‘हम आपके हैं कौन’ आणि ‘हम साथ-साथ हैं’ यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये ते झळकले. विशेषतः सूरज बडजात्या यांच्या ‘मैंने प्यार किया’, ‘हम आपके हैं कौन’ आणि ‘हम साथ-साथ हैं’ या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. चित्रपटांव्यतिरिक्तअजित यांनी दूरदर्शनवरही काम केलं. ‘हसरतें’, ‘दाने अनार के’ आणि ‘एक महल हो सपनों का’ यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. हिंदीसोबतच त्यांनी सिंधी चित्रपटांमध्ये तसेच गुजराती आणि मराठी रंगभूमीवरही काम केलं.
अजित यांनी अभिनेत्री चारुशीला साबळे यांच्याशी लग्न केलं. चारुशीला प्रसिद्ध मराठी लोककलावंत आणि शाहिर साबळे यांची मुलगी आहे. अजित आणि चारुशीला यांना त्रिशाला आणि योहाना अशा दोन मुली आहेत. त्रिशालानं अभिनयापासून दूर राहण्याचा मार्ग निवडला, तर योहानानं आपल्या आई-वडिलांचा कलाक्षेत्रातील वारसा पुढे नेला. अजित यांची मुलगी योहाना वाचानीनं हिंदी चित्रपटसृष्टीत स्टारकिड म्हणून मोठा ब्रेक घेण्याऐवजी मराठी मनोरंजन, दूरदर्शन आणि रंगभूमीमध्ये काम केलं.
Kshama Deshpande : सावित्रीबाई फुलेंची भूमिका मॅनिफेस्ट केलेली, अमोल कोल्हेंचा फोन, क्षमाची निवड
योहानानं २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘महाराष्ट्र शाहीर’ या सिनेमात काम केलंय. विशेष म्हणजे ‘महाराष्ट्र शाहीर’मध्ये तिनं स्वतःच्या आईची, म्हणजेच चारुशीला साबळे यांची भूमिका साकारली. योहानानं ‘मुक्तिबंधन’सारख्या दूरदर्शन मालिकेतही काम केलं असून रंगभूमीशी तिचं नातं कायम राहिलं. बॉलिवूडमध्ये मोठी स्टार म्हणून तिची ओळख निर्माण झाली नसली, तरी विविध माध्यमांमध्ये तिनं सातत्यानं काम केलंय. २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या शाहिद कपूर आणि अमृता राव यांच्या ‘विवाह’ चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शनाच्या टीममध्ये योहानानं काम केलं आहे.
वयाच्या ५२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
अजित वच्छानी यांचं २५ ऑगस्ट २००३ रोजी वयाच्या अवघ्या ५२व्या वर्षी निधन झालं. दीर्घकाळ आजाराशी झुंज दिल्यानंतर मुंबईतील रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. अजित यांच्या मृत्यूला दोन दशकांहून अधिक काळ लोटला असला तरी आजही चाहते त्यांची आठवण काढतात.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा