Ahilyanagar Jamkhed Youth Fell Under Bridge in dark and Died after not Noticing Pothole; पहाटेच्या अंधारात निघाला, खड्डा न दिसल्यानं बाईकसह पुलाखाली कोसळला; कर्ता लेक गेल्यानं कुटुबीयांचा काळीज चिरणारा आक्रोश
Ahilyanagar Jamkhed Youth Fell Under Bridge in dark and Died after not Noticing Pothole; पहाटेच्या अंधारात निघाला, खड्डा न दिसल्यानं बाईकसह पुलाखाली कोसळला; कर्ता लेक गेल्यानं कुटुबीयांचा काळीज चिरणारा आक्रोश
Ahilyanagar Youth Bike Accident : राज्यात अपघातांचं प्रमाण देखील प्रचंड प्रमाणात वाढत चाललं आहे. अशातच अहिल्यानगरमधील जामखेड येथे एक भीषण अपघात झाला. या अपघातात एका तरुणाचा करुण अंत झालाय, त्याच्या जाण्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
जामखेड तरुण अपघात मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अनिकेत यादव, अहिल्यानगर : जामखेड-माहीजळगाव महामार्गावरील भातोडी येथील बांधकाम सुरू असलेल्या पुलावर सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अपूर्ण पुलाजवळ कोणतीही प्रभावी खबरदारी नसल्याचा आरोप होत असताना, अंधारात पुलाच्या खड्ड्याचा अंदाज न आल्यानं मोटारसायकलस्वार तरुण थेट पुलाखाली कोसळला आणि त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
पहाटेच्या अंधारात खड्ड्याचा अंदाज नाही
या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. मयत बालाजी विलास पागिरे (रा. मतेवाडी, हल्ली मुक्काम पोकळे वस्ती, जामखेड) हा पहाटे हरिनारायण आष्टी येथून जामखेडकडे मोटारसायकलवरून येत होता. भातोडी गावाजवळ नदीवरील पुलाचं बांधकाम सुरू असल्यानं रस्त्यात मोठा खड्डा होता. मात्र, पहाटेच्या अंधारात त्याचा अंदाज न आल्यानं मोटारसायकल थेट पुलाखाली कोसळली. या भीषण अपघातात डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाल्यानं बालाजीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. Udayanraje Bhosale : छत्रपतींचे वंशज कमिटमेंट विसरले का? साताऱ्यातील विद्यार्थी आंदोलनांची दखलही नाही, उदयनराजेंविरोधात संताप तीव्र पहाटे ग्रामस्थांची ये-जा सुरू झाल्यानंतर पुलाखाली मोटारसायकलसह तरुण पडल्याचं दिसून आलं. ग्रामस्थांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. याचवेळी मृताच्या मोबाईलवर जामखेड येथील अवधूत हॉटेलच्या मालकाचा फोन आला. ग्रामस्थांनी फोन उचलून अपघाताची माहिती दिली. माहिती मिळताच हॉटेलमालक घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आष्टी पोलिसांना व रुग्णवाहिकेला कळविण्यात आलं. मृतदेह जामखेड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर बालाजीचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं.
या दुर्घटनेनंतर बांधकाम सुरू असलेल्या पुलाजवळ पुरेसे इशारा फलक, बॅरिकेड्स, रिफ्लेक्टर आणि रात्रीसाठी प्रकाशव्यवस्था होती का? असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. अपूर्ण पुलांवर सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा अभाव नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याची भावना व्यक्त होत असून, संबंधित ठेकेदार आणि जबाबदार यंत्रणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा