Headlines

Jamkhed Srigonda Road Accident Eicher Truck collides with Car kills Two Cousins Crime News; आयशरला धडकून कारचा चेंदामेंदा, शासकीय सेवेतील दोघा चुलत भावांचा करुण अंत, पत्रा कापून बाहेर काढण्याची वेळ


Jamkhed Srigonda Road Accident : शासकीय सेवेत असलेले दोघेही चुलतभाऊ आपल्या मूळगावातून पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास नोकरीच्या ठिकाणी निघाले होते. त्याचवेळी समोरुन येणाऱ्या आयशर टेम्पोची त्यांच्या कारला समोरासमोर जोरदार धडक बसली.

Ahilyanagar Accident Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अहिल्यानगर : जामखेड-श्रीगोंदा मार्गावर रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण श्रीगोंदा तालुका हादरला. पाटोदा गरडाचे गावाजवळ रस्त्याच्या दुरुस्तीमुळे सुरु असलेल्या एकेरी वाहतुकीदरम्यान चारचाकी आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात श्रीगोंद्यात शासकीय सेवेत कार्यरत असलेले दोन चुलतभाऊ जागीच ठार झाले.

धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की चारचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला, तर दोघांचेही शव वाहनात अडकून पडले होते. या दुर्घटनेत निखिल मोतीलाल बहुरे (महसूल सहाय्यक, तहसील कार्यालय, श्रीगोंदा) आणि रामचंद्र महाजन बहुरे (मोजणीदार, पाटबंधारे विभाग, श्रीगोंदा) या दोन शासकीय कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. दोघेही मूळचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील असून सध्या श्रीगोंद्यात नोकरीनिमित्त वास्तव्यास होते.

चुलतभाऊ गावातून नोकरीला निघालेले

मिळालेल्या माहितीनुसार रविवारी दि. १९ जुलै रोजी पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास दोघेही चुलतभाऊ आपल्या मूळगावातून श्रीगोंद्याकडे नोकरीच्या ठिकाणी निघाले होते. त्याचवेळी समोरुन येणाऱ्या आयशर टेम्पोची त्यांच्या कारला पाटोदा गरडाचे गावाजवळील वळणावर समोरासमोर जोरदार धडक बसली.
Maharashtra TimesCrime News : 8 वर्षांच्या रिलेशननंतर प्रेमभंग, मुंबईत तरुणीने जीवन संपवलं, कुटुंबीयांनी बॉडी प्रियकराच्या घरी नेली, मंगळसूत्र घालून अंत्यविधी करण्याची मागणी
रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्याने दुरुस्तीचे काम सुरु होते. त्यामुळे एका बाजूची वाहतूक बंद करुन केवळ एकाच लेनवरून वाहने सोडली जात होती. याच ठिकाणी दोन्ही वाहने समोरासमोर आल्याने हा भीषण अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरुन फरार झाला. या प्रकरणी जामखेड पोलिसांनी टेम्पो चालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु आहे.

मी अस्वस्थ, बीडमध्ये काहीही झाल्यास माझं नाव घेतलं जातं; धनंजय मुंडेंची खंत

अकाली निधनाने सर्वत्र हळहळ

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघ तसेच पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वाहनाचा पत्रा कापून दोघांना बाहेर काढण्यात आले. मात्र जामखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
Maharashtra TimesNagpur Crime : पुण्यातील नर्सिंग विद्यार्थिनीला इन्स्टावर मित्र मिळाला, 21 वर्षीय तरुणाने नागपुरात बोलावलं, भेटीत भलताच प्रकार
या भीषण अपघातानंतर नागरिकांनी संताप व्यक्त करत रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामात पुरेशा सुरक्षा व्यवस्थेचा अभाव असल्याचा आरोप केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे श्रीगोंदा तहसील कार्यालय, पाटबंधारे विभाग यांच्यावर शोककळा पसरली असून दोनही भाऊ शासकीय कर्मचाऱ्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.