Headlines

Agniveer Returns Home in Uniform Salutes His Late Father in Emotional Viral Video | स्वप्न पूर्ण झालं पण कौतुकासाठी वडीलच नव्हते, मुलानं वडिलांच्या पार्थिवासमोर ठोकला अखेरचा सलाम, पाहून तुम्ही सुद्धा रडाल


Indian Army Viral Video: सनी सिंह रावत यांनी वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण केली, पण ती पाहण्यासाठी वडील या जगात नव्हते. त्यामुळे त्यांनी भारतीय सैन्याच्या गणवेशात त्यांना अखेरचा सलाम केला. हा व्हिडीओ पाहून नेटकरी भावुक झाले आहेत.

Agniveer Sunny Singh Rawat
(फोटो सौजन्य – trolls_official/Instagram)
आपलं स्वप्न आपल्या मुलांनी पूर्ण करावं, अशी इच्छा जवळपास प्रत्येक आई-वडिलांची असते. आणि काही मुलं खरंच जीवतोड मेहनत करून पालकांचं ते स्वप्न पूर्णही करतात. पण ते स्वप्न पूर्ण झाल्यानंतर पालकांनी आपलं कौतुक करावं, अशी प्रत्येक मुलाची इच्छा असते. किंबहुना, त्यातच खरी गंमत असते. मात्र, पालकांची इच्छा पूर्ण केल्यानंतर ते दृश्य पाहण्यासाठी पालकच उपस्थित नसतील, तर त्या वेदना शब्दांतही सांगता येणार नाहीत.

अशाच एका मुलाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा मुलगा वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी अग्निवीर झाला. पण ते पाहण्यासाठी नियतीनं त्याच्या वडिलांना वेळच दिला नाही. त्यापूर्वीच त्यांचं दुःखद निधन झालं. अखेर वडिलांच्या पार्थिवासमोर त्यानं परेड करून दाखवली. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

मुलानं वडिलांची इच्छा केली पूर्ण

मुलानं वडिलांची इच्छा केली पूर्ण

हा व्हिडीओ trolls_official या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. ही घटना राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातील नरवर परिसरातील भवानी खेडा गावात घडली आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, अग्निवीर सनी सिंह रावत प्रशिक्षण पूर्ण करून आपल्या मूळ गावी परतला. मात्र, त्याआधीच त्यांचे वडील कृपाल सिंह रावत यांचं प्रकृतीच्या कारणामुळे निधन झालं होतं. आपल्या मुलानं भारतीय सैन्यात जावं, अशी त्यांची इच्छा होती. अन् मुलानं ती इच्छा पूर्णही केली. पण आपल्या मुलाला भारतीय सैन्याच्या गणवेशात ते पाहू शकले नाहीत. मात्र, सनी सिंह रावत यांनी वडिलांच्या पार्थिवासमोर लष्करी गणवेशात परेड करून त्यांना अखेरचा सलाम ठोकला. हा क्षण खरंच इतका भावुक करणारा आहे की, तो पाहून डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

व्हिडीओ पाहून नेटकरी झाले भावुक

​ ​

हा व्हिडीओ १ लाख ४८ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसंच, नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर भावुक करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तर हा व्हिडीओ पाहून रडू आल्याचंही म्हटलं आहे.

(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा