Headlines

Abhijeet Dipke CJP Meeting: सीजेपी आंदोलनाची दिशा आज ठरणार; अभिजित दीपके यांच्या घरी कोअर कमिटीची बैठक – cjp team chhatrapati sambhajinagar two day strategy meeting after delhi protest


म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: नवी दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनानंतर कॉक्रोच जनता पार्टीची (सीजेपी) पुढील रणनीती ठरविण्यासाठी वाळूज महानगर येथे संस्थापक, अध्यक्ष अभिजित दीपकेयांच्या घरी बुधवारी कोअर कमिटीची बैठक झाली. आज, गुरुवारीही बैठक होणार असून, सर्व मुद्यांवर चर्चा झाल्यानंतर दुपारी दोन वाजता पक्षाची पुढील दिशा प्रसारमाध्यमांसमोर जाहीर केली जाणार असल्याची माहिती दीपके यांनी दिली.

जंतरमंतरवरील आंदोलनाला मोठे समर्थन मिळाल्याने लोकांच्या अपेक्षा वाढल्या असून, देशभरात संघटन कसे वाढवायचे, आंदोलनाची पुढील दिशा काय असावी, यावर बैठकीत चर्चा होत असल्याचे त्यांनी सांगितले.

Maharashtra TimesTukaram Mundhe : नियमांनुसार काम करायचं नसेल तर राजीनामा देऊ शकतात, कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवर तुकाराम मुंढे यांची भूमिका
शिक्षण, राजकारण, न्याय व्यवस्था, निवडणूक विभाग, बेरोजगारी, देशातील आर्थिक संकट, ई-२० आणि प्रसारमाध्यमे आदी विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे. बैठकीस सौरभ दास, आशुतोष रांका, वैष्णवी गौर, रत्ना सिंग, दीपक चौधरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

झारखंडमध्ये भेट देणार

झारखंडमधील आंदोलक विद्यार्थ्यांना ‘सीजेपी’चा पूर्ण पाठिंबा असून, त्यांच्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचेही दीपके यांनी सांगितले. सोनम वांगचुक हे मार्गदर्शक असून, प्रकृती ठीक नसल्याने ते बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. यावेळी ‘नीट’ पेपरफुटीच्या नैराश्यातून आत्महत्या केलेल्या नांदेड येथील सुशील विलास घुगे या विद्यार्थ्याची आई शीतल घुगे यांनी दीपके यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दीपके यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.

Maharashtra TimesCJP राजकारणात उतरणार का? अभिजीत दीपके यांनी स्पष्टच सांगितलं; झारखंड आंदोलनावरही भूमिका जाहीर
‘त्या’ विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देऊ

या वेळी ‘नीट’ पेपरफुटीनंतर नैराश्यातून आत्महत्या केलेल्या नांदेड येथील सुशील विलास घुगे या विद्यार्थ्यांची आई शीतल घुगे यांनी दीपके यांची भेट घेतली. आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन अभिजित दीपके यांनी दिले, अशी माहिती घुगे यांनी पत्रकारांना दिली.

जंतरमंतरवरील आंदोलनाला मोठे समर्थन मिळाल्याने लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. देशभरात संघटन कसे वाढवायचे, आंदोलनाची पुढील दिशा काय असावी, यावर बैठकीत चर्चा झाली. –अभिजित दीपके, संस्थापक, सीजेपी

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत