Headlines

Ujjwal Nikam : ‘अलका याग्निक आणि अनुराधा पौडवाल यांच्यातील वादसुद्धा त्यांच्या मृत्यूचं कारण’, गुलशन कुमार मृत्यूप्रकरणी काय म्हणाले उज्ज्वल निकम?


Ujjwal Nikam : उज्ज्वल निकम यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये गुलशन कुमार मृत्यूप्रकरणी भाष्य केलं आहे.

Ujjwal Nikam On Gulshan Kumar Death
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – भारतीय संगीत क्षेत्रातील ‘कॅसेट किंग’ म्हणून ओळखले जाणारे गुलशन कुमार यांची १२ ऑगस्ट १९९७ रोजी दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. मंदिरातून परत येत असताना १६ गोळ्या लागून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनं संपूर्ण देशाला धक्का बसला होता. अशातच आता याप्रकरणी उज्ज्वल निकम यांनी भाष्य केलं आहे.

काय म्हणाले उज्ज्वल निकम?

एका जुन्या मुलाखतीमध्ये उज्ज्वल निकम यांनी सांगितलेलं की, नदीम सैफी हा गुलशन कुमार यांच्या हत्येचा मास्टरमाइंड आहे. आता एका मुलाखतीमध्ये गुलशन कुमारच्या हत्येबद्दल बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले की, ‘गुलशन कुमारची हत्या त्यांच्या आपापसातील वादावरून करण्यात आलेली. मला त्याबद्दल सांगणं योग्य वाटत नाही. आपापसातील वाद, प्रोफेशनल वाद यामुळे त्यांची हत्या करण्यात आली. त्यांची हत्या करणाऱ्या एका शुटरला अटकही करण्यात आली. पण, त्या मागचे मास्टर माइंड समोर आले नाहीत. त्यांचा हेतू वेगळा होता. अल्का याग्निक आणि अनुराधा पौडवाल यांच्यातील वादसुद्धा गुलशन कुमार यांच्या हत्येचं कारण आहे. आम्हाला तपासादरम्यान याबद्दल समजलं. आणि आता याबद्दल बोलून काही फायदा नाही. कारण, त्याचा पुरावा नाही.’

Onkar Raut Celebrity Corner : टाइमपास ते महाराष्ट्राची हास्यजत्रा…ओंकार राऊतसोबत खास गप्पा

‘नदीम सैफी भारतात यायला तयार होता, पण तो नाही आला. अजूनही त्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. आपल्या Dying declaration कायद्यानुसार, मृत व्यक्ती शेवटी जे काही बोलला असेल ते खरं मानलं जातं. पण, फॉरेन कोर्टमध्ये त्यांच्या कायद्यानुसार आपले पुरावे तपासले जातात. गुलशन कुमारच्या केसमध्येही Dying declaration होतं. पण, फॉरेन कोर्टमध्ये त्याला मान्यता दिली नाही.’ असं उज्ज्वल निकम यांनी शेवटी सांगितलं. ‘द लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये उज्ज्वल निकम बोलत होते.
Maharashtra TimesMaharashtrachi Hasyajatra : लॉर्ड शार्दुल ठाकूरला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची भुरळ, क्रिकेटरनं केलं समीर चौघुलेंचं कौतुक
इतकंच नव्हे तर शुभंकर मिश्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनुराधा पौडवाल यांना गुलशन कुमार यांच्या हत्येबद्दल विचारण्यात आलं. त्यावर अनुराधा म्हणाल्या की, ‘मला माहीत नाही. मला नकारात्मक गोष्टींमध्ये कधीच रस नव्हता. जरी काही असलं तरी, गुलशनजी माझ्याशी त्याबद्दल कधीच बोलले नाहीत. त्यामुळे त्यावेळी काय घडत होतं हे सांगण्याच्या स्थितीत मी नाही. मी खरं बोलते. मी नेहमीच स्वतःला नकारात्मकतेपासून दूर ठेवलं आहे.’