Headlines

Isha keskar Talks About Remuneration and Fees; Isha keskar: ‘जय मल्हार’ मालिकेसाठी ईशा केसरकरला मिळायचं पर डे इतकंच मानधन, स्वत:च केला खुलासा


Isha keskar Talks About Remuneration and Fees:अभिनेत्री ईशा केसकर सध्या चर्चेत आली आहे. ईशा ही मराठी कलाविश्वातील एक अत्यंत स्पष्टवक्ती अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Isha keskar
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: मराठी सिने आणि टीव्ही इंडस्ट्रीतली लोकप्रिय अभिनेत्री ईशा केसरकर हिनं मालिका विश्वातून काही काळ ब्रेक घेतला. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिनं तिच्या करिअरवर तसंच वैयक्तिक आयुष्यातल्या काही प्रसंगावर भाष्य केलं. ईशानं तिच्या करिअरमधील वेगवेगळ्या टप्प्यावर आलेल्या अनुभवांबद्दलही सांगितलं. इंडस्ट्रीतल्या मानधनाच्या मुद्द्यावरही, इंडस्ट्रीतल्या राजकारणावर ती व्यक्त झाली.

होय इंडस्ट्रीत राजकारण, जातीवाद आहे
मराठी सिनेइंडस्ट्रीत राजकारण, जातीवाद आहे का?असं विचारला असता ईशानं बिनधास्त पणे उत्तर दिलं. होय, इंडस्ट्रीत राजकारण आहेच, आपापल्या परीने ते केलं जातं. जातीवाद आहे. हे नाही असं मी म्हणणारच नाही, असं ईशा म्हणाली.कलाकारांची निवड करतानागी, कास्टिंगवर याचा परिणाम होतो. जास्त प्रश्न विचारणारी अभिनेत्री नको असते दिग्दर्शकाला, असंही ईशानं यावेळी म्हटलं.

Maharashtra TimesSaorabh Choughule : वरच्या लेव्हलच्या राजकरणात प्रत्येक मंत्री या पक्षातून त्या पक्षात जातो अन् कार्यकर्ता एकनिष्ठ म्हणून फक्त पाहत राहतो! सोनम वांगचुक प्रकरणी सौरभ चौघुलेची पोस्ट
१५०० रुपये पर डे मानधन
सिनेमा निवडताना मला तुम्ही माणूस म्हणून पटला पाहिजेत आणि जी गोष्ट आहे त्यात मला जीव, आत्मा दिसला पाहिजे, असं ईशा म्हणाली. मालिकेत या दोन्ही गोष्टी नसतात, म्हणून आम्ही जास्त पैसे घेतो.

जय मल्हारसाठी मी १५०० रुपये पर डे पासून सुरुवात केली होती. हे सगळे पैसे मी आई-बाबांना पाठवायचे.ते नंतर मला उदरनिर्वाहासाठी लागतील तसे पाठवायचे. त्यांचा कंट्रोल होता तोपर्यंत ठिक होतं. पण जसं जसं मी काम करत गेले, मालिका घेत गेले. तसं मी मानधनही वाढवलं. आता मी हे पात्र साकारतेय,इतके पैसे द्या. पण मी हे पात्र चांगलं करून दाखवलं, तर मला पुढच्या वर्षी इतके पैसे हवेत, असं मी स्पष्ट सांगते. मी तुम्हाला आगाऊ वाटत असेल तर तो तुमचा प्रॉब्लेम…असंही ईशा म्हणाली. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत ती बोलत होती.

Maharashtra TimesAdinath And Urmila Kothare Divorce : चर्चा खऱ्या ठरल्या; मराठी सिनेइंडस्ट्रीतील स्टार कपल आदिनाथ आणि उर्मिला कोठारे यांचा घटस्फोट
म्हणून सोडली ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिका
ईशानं ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिका सोडल्यानंतर बरीच चर्चा झाली होती. यावर आता तिनं भाष्य केलं. मालिकांमध्ये सलग १४ ते १६ तास शूटिंग करावं लागतं. या सततच्या कामाच्या दडपणामुळे आणि अपुऱ्या झोपेमुळं तिच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ लागला होता. चॅनेल, प्रोडक्शन टीम आणि ती स्वतः यांच्यात कामाच्या वेळेबाबत कोणताही सुवर्णमध्य निघू न शकल्यानं, माझं आणि मालिकेचं नुकसान होण्यापेक्षा बाजूला होणं मी पसंत केलं, असं तिनं स्पष्ट केलं.