अन्न आणि औषध प्रशासाने मुंबईत मोठी कारवाई केली आहे. दुधाच्या पिशव्यांमध्ये छेडछाड करणाऱ्यांच्या एफडीए आणि पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित अन्नपदार्थ मिळावेत यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडून चुकीचे कामे करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून ही कारवाई केली जात आहे. तुकाराम मुंढे यांच्याकडून दुधामध्ये भेसळ करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जात आहे. दुधामध्ये भेसळ करुन ग्राहकांना विकणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. अशाचप्रकारची कारवाई मुंबईत करण्यात आली आहे. मुंबईत दुधाच्या पिशव्यांमध्ये छेडछाड करुन विकणाऱ्यांच्या नांग्या ठेचण्यात आल्या आहेत. एफडीएची ही मोठी कारवाई मानली जात आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी आणि मुंबई गुन्हे शाखा युनिट-11 चे पोलीस अधिकारी यांनी संयुक्त विद्यमाने गोरेगाव येथे पहाटे चार वाजेच्या सुमारास कांदिवली पश्चिमेत छापा टाकला. यावेळी आरोपी हे दुधाच्या पिशव्यांमध्ये छेडछाड करत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. पोलीस आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांनी आरोपींना रंगेहाथ पकडलं. यावेळी आरोपी कशाप्रकारे दुधाच्या पिशव्यांसोबत छेडछाड करायचे तेदेखील अधिकाऱ्यांनी कॅमेऱ्यात कैद केलं.
दोन विक्रेत्यांवर कारवाई
या कारवाईत कृष्णा लिंगमपल्ली (वय ४८ वर्षे) आणि रवी पाटीकाका (वय ४५ वर्षे) या दोन दूध विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. हे दोन्ही आरोपी गोरेगाव पश्चिमेतील प्रेमनगर येथे वास्तव्यास आहेत. या कारवाईमध्ये 822 दूधाच्या पिशव्या (एकूण 558 लिटर), अंदाजे 39,503 रुपये किंमतीचा साठा जप्त करून नष्ट करण्यात आला. तपासणीदरम्यान दूधाच्या पिशव्यांमध्ये छेडछाड करून त्यांची विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले.
आरोपींवर गुन्हा दाखल
या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २७४, ३४५(३), ३४७(१), ३१८(४), ३३६(३), ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील कलम २६, २७, ३१ सह कलम ५९ व ६३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
गोवंडीतही मोठी कारवाई
एफडीएने गोवंडी येथे देखील दुग्ध व्यवसायिकाविरुद्ध कारवाई केली. एफडीएने गोवंडी येथील डेअरीवर धाड टाकली. यावेळी तपासणीदरम्यान संबंधित अन्न व्यवसायिकाकडून स्टेनलेस स्टील मिल्क चिलिंग टँकमध्ये तसेच प्लास्टिकच्या पिशव्या आणि कॅनमध्ये सैल पाश्चराईज्ड म्हशीचे दूध साठवून त्याची विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले.
नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट
सदर विक्री ही मा. आयुक्त (अन्न), महाराष्ट्र राज्य यांच्या आदेश क्र. FDA/COMM/FOOD/MILK/७१३-२०२६/०७, ३ जुलैमधील तरतुदींचे उल्लंघन करणारी असल्याचे आढळले. सदर आदेशानुसार पाश्चराईज्ड दूधाची विक्री केवळ सीलबंद, आवश्यक लेबलयुक्त पॅकेजमध्येच करण्यास परवानगी आहे.
१६८३ लीटर सैल पाश्चराईज्ड म्हशीचे दूध नष्ट
तपासणीदरम्यान विक्रीसाठी ठेवलेले एकूण १,६८३ लीटर सैल पाश्चराईज्ड म्हशीचे दूध (१,५०० लिटर मिल्क चिलिंग टँकमध्ये आणि १८३ लिटर प्लास्टिक पिशव्या/कॅनमध्ये) आढळून आले. या साठ्याची अंदाजे किंमत १,०७,७१२ रुपये इतकी होती. हा सर्व साठा जागेवर नष्ट करण्यात आला. एकूण १,६८३ लीटर दूध जलनिस्सारण व्यवस्थेमध्ये सोडून जागेवरच नष्ट करण्यात आले.
थेट व्यवसाय बंद करण्याची नोटीस
यावेळी पाश्चराईज्ड म्हशीच्या सैल दुधाचा एक नमुना प्रयोगशाळीय विश्लेषणासाठी घेण्यात आला असून, प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आवश्यक ती पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच, अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीने संबंधित आस्थापनास व्यवसाय बंद नोटीस बजावण्यात आली आहे. अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील कलम २६ व २७ सह कलम ५२ अन्वये पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा