Rohit Sharma Virat Kohli Record : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत जोडी म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा रेकॉर्ड केला आहे. भारतासाठी हा तिसरा सर्वोत्तम विक्रम ठरला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांनी इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत आणखी एका मोठ्या विक्रमावर नाव कोरले. या सामन्यात दोघांनी मिळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जोडी म्हणून 8 हजार धावांचा टप्पा पार केला. भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या जोड्यांच्या यादीत आता रोहित-विराट तिसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे भारतीय क्रिकेटमध्ये या जोडीचं स्थान अधिक भक्कम झालं आहे.
सचिन-गांगुली अजूनही अव्वल
भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या जोड्यांमध्ये सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली अव्वल आहेत. या दोघांनी सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये 12,400 धावा जोडल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांची जोडी असून त्यांच्या नावावर 11,037 धावा आहेत. रोहित-विराटने 8 हजार धावांचा टप्पा गाठत तिसरे स्थान पटकावले आहे.
कार्डिफ येथे सुरू असलेल्या दुसऱ्या वनडेत शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी भारताला सावध सुरुवात करून दिली. गिल बाद झाल्यानंतर रोहित आणि विराट यांनी दुसऱ्या विकेटसाठी 61 चेंडूंमध्ये 60 धावांची भागीदारी केली. रोहितने 47 चेंडूत 26 धावा केल्या, तर विराटने या भागीदारीदरम्यान ऐतिहासिक टप्पा गाठला.
दरम्यान या सामन्यात भारताची चांगली पकड दिसताना अचानक खेळ बदलला आहे. इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारताच्या 3 फलंदाजांना एकामागोमाग एक माघारी पाठवलं. उपकर्णधार श्रेयस अय्यरची शानदार फलंदाजी सुरु आहे. (सध्या 65 चेंडूंमध्ये 63) त्याने 42 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. पण त्यानंतर भारतीय संघ सातत्याने विकेट गमावत असून, अय्यर एकटाच भक्कमपणे आपली विकेट टिकवून आहे. वॉशिंग्टन सुंदरला साकिबने 2 धावांवर तर जोफ्रा आर्चरने अक्षर पटेल 1, शिवम दुबे 0 वर आऊट केले. सध्या मैदानावर श्रेयस आणि गुरनूर ब्रार खेळत आहेत. भारताची धावसंख्या 40 व्या षटकापर्यंत 210-7 झाली आहे.
भारताच्या संघात आजारी असलेल्या केएल राहुलच्या जागी ईशान किशनला संधी देण्यात आली. दुसरीकडे इंग्लंडने जोश टंग आणि लियाम डॉसन यांच्या जागी साकिब महमूद आणि गस अॅटकिन्सन यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला. या बदलांसह दोन्ही संघ मालिकेत महत्त्वाच्या विजयासाठी मैदानात उतरले आहेत.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा