Headlines

Amravati Crime: अमरावतीत दिवसाढवळ्या 20 वर्षीय तरुणाला संपवलं; हाताचा पंजाच छाटला, प्रेमप्रकरणातून हल्ल्याचा संशय – amravati 20 yrs old youth killed over love affair five suspects captured on cctv


Amravati Crime: अफाक हा सोशल मीडियावर रील तयार करीत होता. तो शहरातील एका युवतीच्या संपर्कात होता आणि त्यातूनच हे हत्याकांड घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

amaravti crime
अमरावती क्राईम(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, अमरावती: शहराच्या मध्यवर्ती आणि गजबजलेल्या रुख्मिणीनगर भागातील राजेंद्र कॉलनी परिसरातील पोरवाल रोडवर बुधवारी सकाळी साडेआठ वाजता एका २० वर्षीय तरुणाची दिवसाढवळ्या अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. शेख अफाक शेख अकिल (वय २०) रा. ताजनगर असे मृत तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी याप्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेतले असून त्यापैकी तिघे अल्पवयीन आहेत. या थरारक हत्याकांडामुळे अमरावती शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या भीषण हत्याकांडामागे प्रेमप्रकरण आणि सोशल मीडियावरील वाद असल्याचे उघड झाले आहे.

Maharashtra TimesNCP नेते फडणवीसांना ‘वर्षा’वर भेटले, पण पार्थ-सुनेत्रा पवारांना कल्पनाही नव्हती; तटकरेंना ‘देवगिरी’वर बोलावणं, गैरसमजाचं कारण
मृतक शेख अफाक आणि आरोपींमध्ये गेल्या काही दिवसांपासून एका प्रेमप्रकरणावरून तसेच इन्स्टाग्रामवरील चॅटिंगवरून तीव्र वाद सुरू होता. हाच वाद सामोपचाराने मिटवण्यासाठी दोन्ही गट सकाळी राजेंद्र कॉलनी परिसरातील एका कॅफेसमोर एकत्र आले होते. चर्चा सुरू असतानाच दोन्ही बाजूंचे नियंत्रण सुटले आणि वाद टोकाला गेला. शाब्दिक चकमकीचे रूपांतर अचानक रक्तरंजित हल्ल्यात झाले.

दिवसाढवळ्या शेख अफाक शेख अकिल याची घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील तीन आरोपी हे अल्पवयीन आहेत.

घटनाक्रम परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाला असून त्यात अफाक तेथे येण्यापूर्वी एक तरुणी आरोपी तरुणांसह गप्पा मारीत असल्याचे दिसून येत आहे. अफाकच्या मृत्यूची बातमी पसरताच ताज कॉलनी परिसरातील नागरिकांनी आणि नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केल्याने काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

Maharashtra TimesPune Crime: पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाने जीवन संपवलं; व्हिडिओमध्ये रवींद्र धंगेकरांसह अनेक बड्या राजकीय नेत्यांची नावं घेतली!
हाताचा पंजा तुटला
सहा ते सात हल्लेखोरांनी अफाकवर कोयता आणि चाकूने जीवघेणा हल्ला चढवला. हा हल्ला इतका भीषण होता की, कोयत्याच्या पहिल्याच वाराने अफाकच्या हाताचा पंजा मनगटापासून वेगळा होऊन जमिनीवर पडला. यावेळी गंभीर अवस्थेतही अफाकने जीव वाचवण्यासाठी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोरांनी पाठलाग करून त्याला गाठले. त्याच्या चेहऱ्यावर, गळ्यावर आणि शरीरावर चाकूने सपासप वार केले. अफाक रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर आरोपी दुचाकीने घटनास्थळावरून फरार झाले. अफाकला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा