महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वैभवाचे प्रतीक असलेल्या जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्यातील पहिले ऐतिहासिक आणि भव्य ‘उभे रिंगण’ फलटण तालुक्यातील तरडगाव जवळील चांदोबाचा लिंब येथे अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पा
.
लोणंद येथील दीड दिवसांचा मुक्काम आटोपून पालखी सोहळ्याने खंडाळा तालुक्यातून फलटण तालुक्यामध्ये प्रवेश केला. कापडगाव येथील सरदेचा ओढा येथे फलटण तालुक्याच्या वतीने सोहळ्याचे अत्यंत दिमाखदार स्वागत करण्यात आले.
या स्वागतप्रसंगी आमदार सचिन पाटील, माजी आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार अभिजित जाधव आणि अभिजित नाईक निंबाळकर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अश्वांची नेत्रदीपक दौड आणि वारकऱ्यांचा अथांग उत्साह
दुपारच्या सुमारास पालखी सोहळा चांदोबाचा लिंब या ऐतिहासिक ठिकाणी विसावला आणि परंपरेनुसार उभ्या रिंगणाची लगबग सुरू झाली. महामार्गाच्या दुतर्फा लाखो वारकऱ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने रांगा लावल्या.
मुख्य रथापुढील २७ दिंड्यांमधून माऊलींचा पवित्र अश्व अत्यंत वेगाने धावत सुटला. माऊलींच्या पावन पादुकांचे दर्शन घेतल्यानंतर हा अश्व शेवटच्या दिंडीपर्यंत वाऱ्याच्या वेगाने धावत गेला आणि तेथून पुन्हा मुख्य रथाकडे परतला. अश्वांच्या या नेत्रदीपक दौडीने उपस्थित भाविकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.
परंपरा आणि भक्तिमय विधी
माऊलींच्या रथाजवळ दोन्ही अश्वांचे आगमन झाल्यानंतर सोहळा प्रमुखांच्या हस्ते दोन्ही अश्वांचे पूजन करून त्यांना नैवेद्य दाखवण्यात आला आणि पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर मुख्य अश्व आणि स्वारीचा अश्व अशा दोन्ही अश्वांनी पुन्हा एकदा अत्यंत वेगवान आणि शिस्तबद्ध धाव पूर्ण केली. रिंगण पूर्ण झाल्यानंतर वारकऱ्यांनी सादर केलेल्या पारंपरिक भारूड, फुगड्या आणि भजनांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला होता.
पहिले उभे रिंगण यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर हा भव्य पालखी सोहळा पुढील मुक्कामासाठी तरडगाव येथील मुख्य पालखी तळाकडे रवाना झाला, जिथे रात्री सोहळ्याचा विसावा झाला.
हे ही वाचा…
काटेवाडीत पार पडले तुकोबांच्या पालखीचे पहिले रिंगण:मेंढ्या का मारतात रथाला प्रदक्षिणा? जाणून घ्या 300 वर्षांचा इतिहास

आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण आज बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे अत्यंत भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. हजारो वारकरी, भाविक आणि टाळ-मृदंगाच्या गजराने संपूर्ण काटेवाडी परिसर दुमदुमून गेला होता. मात्र, हे रिंगण इतर रिंगणांपेक्षा वेगळे ठरते कारण येथे अश्वांचे (घोड्यांचे) नाही, तर ‘मेंढ्यांचे गोल रिंगण’ पार पडते. सविस्तर वाचा…
