Headlines

Bacchu Kadu: कंपन्यांना सरळ करा, अन्यथा कार्यालये पेटवू; बोगस बियाण्यांवरुन बच्चू कडूंचा इशारा – bachchu kadu has warned maharashtra government regarding fake seeds case


Bacchu Kadu: कंपन्यांना सरळ करा, अन्यथा कार्यालये पेटवू! असा बोगस बियाण्यांवरुन बच्चू कडूंनी सरकारला इशारा दिला आहे.

bacchu kadu
बच्चू कडू(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, अमरावती: नैसर्गिक संकटात होरपळणाऱ्या बळीराजाची निकृष्ट बियाण्यांच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या कंपन्यांविरोधात शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या कंपन्यांवर सरकारने तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांचे परवाने कायमचे रद्द करावेत, अन्यथा त्यांची कार्यालये पेटवून दिली जातील, असा थेट इशारा कडू यांनी दिला आहे.

अमरावती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या तपासणीत बूस्टर कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांमध्ये कमालीचा घोळ आणि अनियमितता समोर आली आहे. यानंतर कृषी विभागाने फौजदारी कारवाई केली असली, तरी केवळ तेवढ्याने भागणार नाही, असा आक्षेप कडू यांनी नोंदवला.

Maharashtra TimesTukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका, पुण्याच्या मार्केट यार्डमधील दुकान सील
सध्याचे बियाणे कायदे केवळ नावापुरते उरले असून त्यात आमूलाग्र बदलांची गरज आहे, असे स्पष्ट करत कडू यांनी नव्या कायद्याचा मसुदा मांडला. निकृष्ट बियाणे आढळल्यास शेतकऱ्यांना तत्काळ मोफत दर्जेदार बियाणे मिळायला हवे. तसेच पिकांचे नुकसान झाल्यास संबंधित कंपनीकडून प्रति एकर किमान दोन लाख रुपये नुकसानभरपाई वसूल करण्याची तरतूद नव्या कायद्यात असावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

यशोदा सीड्सविरुद्ध गुन्हे
बुलढाणा : सोयाबीन बियाण्यांच्या उगवणक्षमतेबाबत प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर तपासात अप्रमाणित नमुने आढळून आल्याने यशोदा हायब्रीड सीड्स कंपनीविरुद्ध खामगाव शहर पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट येथील ही कंपनी आहे. खामगाव तालुक्यातील अकोली येथील शेतकरी सुभाष किसन मुजुमले यांनी यशोदा हायब्रीड सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांच्या उगवणक्षमतेबाबत तक्रार केली होती.

Maharashtra TimesHeramb Karmarkar : होर्मुझमध्ये जहाजावरील हल्ल्यात पुणेकर तरुणाने प्राण गमावले, मरीन इंजिनिअर हेरंब करमरकर यांचा करुण अंत
फत्तापूरच्या अवैध उत्खननावर कारवाई होणार- चंद्रशेखर बावनकुळे
वरोरा तालुक्यातील फत्तापूर येथील सर्व्हे नं. १८० व लगतच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अवैध खनिज उत्खनन करून शासनाच्या महसुलाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अवैध उत्खननाची गंभीर दखल घेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, यात दोषी आढळल्यास खाणकाम व्यावसायिकासह तलाठी, तहसीलदार ते प्रांताधिकारी अशा सर्व संबंधित अधिकाऱ्यांवर सामूहिक जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा