सध्याची परिस्थिती सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकांवरील आर्थिक दबाव स्पष्टपणे दर्शवते. सरकारी आकडेवारी आर्थिक स्थिरता आणि माफक वाढ दर्शवत असली तरी कुटुंबांवरील दिवसेंदिवस वाढता आर्थिक भार याकडे दुर्लक्ष करणे दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे.
US Strike Iran: होर्मुझमध्ये पुन्हा तणाव वाढला… अमेरिकेकडून इराणी तेलावरील सवलत रद्द, Crude Oil च्या किमतीत मोठी उसळी
दफनविधी बनले आर्थिक संकट
‘द एक्सप्रेस ट्रिब्यून’च्या अलीकडील अहवालानुसार रावळपिंडीतील कमी उत्पन्न कमावणाऱ्या कुटुंबांसाठी महागाईमुळे अंत्यसंस्कार आणि दफनविधीची व्यवस्था करणे एक आर्थिक आव्हान बनले आहे.
शेजारी आणि स्थानिक स्वयंसेवकांकडून विनामूल्य कबरी खोदण्याची जुनी परंपरा जवळजवळ पाकिस्तानात आता नाहीशी झाली असून याआधी ज्या सेवा देणगी म्हणून मिळायच्या त्यासाठी आता कुटुंबांना किंमत मोजावी लागत आहे. इतकेच नाही तर, शहरातील स्मशानभूमींमधील जागाही हळूहळू संपत असून अनेक स्मशानभूमींमध्ये ‘दफनासाठी जागा उपलब्ध नाही’ असे फलक झळकतात.
पाकिस्तानात महागाईचा भस्मासुर दिवसेंदिवस आणखी ताकदवर होत असून एका कफनची किंमत आता 3000 ते 4000 रुपये झाली आहे, तर गुलाबजल, कापूर, अगरबत्ती आणि फुलांच्या पाकळ्या यांसारख्या आवश्यक वस्तूंसाठी 2000 ते 2500 रुपये लागतात. तसेच एखाद्याला दफन करण्यासाठी जागा मिळवणे, कबर खोदणे आणि विटांनी तयार करण्यासाठी 40,000 ते 45,000 रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो.
Gold Rate Crash: अमेरिकेच्या इराणवरील डबल स्ट्राईकने सराफा बाजार हादरलं! सोने-चांदीची घसरगुंडी सुरूच; गुंतवणूकदार धास्तावले
त्याचप्रमाणे, मृताला स्नान आणि धुण्याच्या विधीसाठी 1000 ते 1500 रुपये मजुरी द्यावी लागते. एखाद्या कुटुंबाला कायमस्वरूपी कबर हवी असेल तर, त्यांना आणखी खर्च करावा लागतो. विटा आणि सिमेंटने बनवलेल्या एका साध्या कबरीसाठी सुमारे 15,000 रुपये तर, कमी दर्जाच्या संगमरवरी फिनिशिंगसाठी 25000 रुपयांपर्यंत आणि अधिक विस्तृत संगमरवरी रचनांसाठी 30000 रुपयांपेक्षा जास्त खर्च करावा लागू शकतो.
हे प्रकरण इतकं गंभीर झालं आहे की जागेच्या कमतरतेमुळे जुन्या कबरी काढल्या जात आहेत किंवा त्यांचा पुनर्वापर केला जात असल्याचेही अहवालातून समोर आले आहे. दफनविधीचा वाढता खर्च महागाईने कुटुंबांची अनपेक्षित खर्च परवडण्याची क्षमता हळूहळू संपत चालल्याचे अधोरेखित करते.
Ethanol Fuel Controversy: भारतात पुन्हा इथेनॉलविरहित पेट्रोल? सरकारकडून नव्याने चाचपणी सुरू; तेल कंपन्यांकडून मागवल्या सूचना
महागाई कमी तरी, लोकांवर ओझे
2023 च्या आर्थिक संकटादरम्यान पाकिस्तानात 40 टक्क्यांनी वाढवणाऱ्या प्रचंड महागाईचा आता जनतेला सामना करावा लागत नाही तरीही राहणीमान स्वस्त झालं आहे असं नाही.पाकिस्तान ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या आकडेवारीनुसार जून 2026 मध्ये ग्राहक महागाईचा दर 11.1% होता. यापैकी शहरी महागाईचा दर 11.2%, तर ग्रामीण महागाईचा दर 10.9% होता.
रावळपिंडीमधील अंत्यविधी खर्चाचा प्रश्न याच व्यापक वास्तवाचा भाग असून गेल्या काही वर्षांत अन्न, वाहतूक, वीज, इंधन आणि घरांच्या किमतीत मोठी वाढ दिसून आली आहे. तसेच अंत्यविधीशी संबंधित वस्तू आणि सेवांच्या किमतीही तितक्याच झपाट्याने वाढल्या आहेत.
पाकिस्तानातील आर्थिक संकटात IMF ची भर
पाकिस्तानच्या आर्थिक व्यवस्थापनात सध्या IMF निर्णायक भूमिका बजावत आहे. मे 2026 मध्ये IMF ने वित्तीय योजना, सुधारणा आणि अर्थसंकल्पीय तयारीचा आढावा घेतल्यानंतर पाकिस्तानी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. चलनवाढ नियंत्रणात ठेवताना कठोर मौद्रिक धोरण आणि वित्तीय शिस्त राखण्याच्या महत्त्वावर नाणेनिधीने पुन्हा एकदा जोर दिलाच पण, IMF-समर्थित कर सुधारणा अनुदान आणि ऊर्जा किमतींशी संबंधित निर्णयांवर प्रभाव टाकत आहेत.

