- Marathi News
- International
- 9 Police Personnel Killed, Many Missing In Gunmen Attack In Balochistan, Police Were Deployed At A Dam Under Construction In Quetta
इस्लामाबाद/क्वेटा10 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

पाकिस्तानच्या दक्षिण-पश्चिम प्रांत बलुचिस्तानमध्ये बंदूकधाऱ्यांच्या हल्ल्यात कमीत कमी ९ पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर अनेक जवान बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. पोलिस कर्मचारी जियारत जिल्ह्यात बांधकामाधीन धरणाच्या सुरक्षेसाठी तैनात होते. हे धरण बलुचिस्तानची राजधानी क्वेटामधील पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी बांधले जात आहे.
जियारतचे डेप्युटी कमिशनर अब्दुल कुद्दुस अचकजई यांनी सांगितले की, हल्लेखोरांनी पोलिस कर्मचाऱ्यांवर अचानक गोळीबार सुरू केला. मारल्या गेलेल्या जवानांमध्ये दोन वरिष्ठ अधिकारी देखील सामील आहेत. हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही. दुसरीकडे, बलूचिस्तानच्या अधिकाऱ्यांनी दावा केला की, हल्ल्यानंतर केलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईत सुरक्षा दलांनी जियारतमध्ये चालवलेल्या ‘क्लिअरन्स ऑपरेशन’ दरम्यान पाकिस्तानी तालिबान (टीटीपी) च्या १५ सदस्यांना ठार केले आहे.
