Headlines

Defense agreement with Indonesia; Will buy Brahmos for five thousand crores, agreement to develop Sabang Port


  • Marathi News
  • International
  • Defense Agreement With Indonesia; Will Buy Brahmos For Five Thousand Crores, Agreement To Develop Sabang Port

जकार्ता/नवी दिल्लीकाही सेकंदांपूर्वी

  • कॉपी लिंक

भारत-इंडोनेशियात पहिल्यांदाच सुमारे ५५०० कोटींचा संरक्षण करार झाला आहे. पीएम नरेंद्र मोदींनी मंगळवारी आपल्या इंडोनेशिया दौऱ्यादरम्यान या कराराची घोषणा केली. इंडोनेशिया भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्रे खरेदी करणार आहे.

मोदींनी इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्यासोबत इतर १४ क्षेत्रांतील करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. यामध्ये मलाक्काच्या आखातातील महत्त्वाचे साबांग पोर्टही भारत विकसित करेल. मोदींनी भारतीय वंशाच्या लोकांना संबोधित करताना म्हटले की, दोन्ही देशांमध्ये परस्पर विश्वासाचा डीएनए आहे.

…२५%जागतिक व्यापार साबांग पोर्टमार्गे होतो, येथे भारताची उपस्थिती

जगातील २५% व्यापार मलाक्का सामुद्रधुनीतून होतो. मलाक्काच्या मुखावरील साबांग पोर्ट आता भारत विकसित करणार आहे. येथे भारताची उपस्थिती असेल. साबांग पोर्ट भारताच्या ग्रेट निकोबार बेटापासून सुमारे १५० किमीवर आहे. म्हणजेच आता भारत बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागरात आपले व्यापार आणि संरक्षण हित अधिक सुरक्षित ठेवू शकेल. चीन गेल्या काही वर्षांपासून लष्करी आणि सागरी उपस्थिती सतत वाढवत आहे. आता भारत साबांग पोर्टच्या माध्यमातून उत्तम जिओ स्ट्रॅटेजिक लोकेशनमध्ये असेल. प्रशांत महासागरातही भारत आपले वर्चस्व वाढवू शकेल.

पीएम मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च सन्मान

जकार्ता | पीएम नरेंद्र मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च सन्मान बिंतांग आदिपूर्णाने सन्मानित करण्यात आले. इंडोनेशियाचे अध्यक्ष सुबियांतो म्हणाले की, मोदींनी संबंध मजबुतीत महत्त्वाचे योगदान दिले. मोदींना मिळालेला हा ३५ वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे. हा सन्मान मिळवणारे ते दुसरे भारतीय पंतप्रधान आहेत. यापूर्वी पंडित नेहरूंना १९९५ मध्ये मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आला होता.

आयआयएम बेंगळुरू इंडोनेशियामध्ये कॅम्पस उघडणार. भारतीय यूपीआयला इंडोनेशिया पेमेंटशी जोडणार. भारत १०० टन प्रगत गव्हाचे बियाणे निर्यात करणार. सी-फूड कोऑपरेशनमध्येही काम होणार.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत