World’s Richest Country: अमेरिकेत सुरू असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत मोठा उलटफेर झाला आहे. नॉर्वेने पाच वेळा फिफा फूटबॉल वर्ल्डकप विजेत्या ब्राझीलला पराभवाचा धक्का दिला. युरोपमधील हा छोटासा देश जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी मानला जातो, जो युरोपमधील तेल आणि गॅसचा सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातदार देश असून देशाच्या अर्थव्यवस्थेत तेल आणि गॅस महत्त्वाची भूमिका बजावतात.

56 लाख लोकसंख्या
केवळ 56 लाख लोकसंख्या असलेला नॉर्वे जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी असून मनुष्यबळ निर्देशांकातही अव्वल देशांमध्ये समावेश होतो. नॉर्वेतील लोक आपला उदरनिर्वाह कसे करतात?
नॉर्वेची अर्थव्यवस्था किती श्रीमंत
स्कँडिनेव्हियन देशांमध्ये नॉर्वे व्यतिरिक्त स्वीडन आणि डेन्मार्क यांचाही समावेश आहे. नॉर्वेची अर्थव्यवस्था अत्यंत समृद्ध आणि मिश्र कल्याणकारी अर्थव्यवस्था मानली जाते तर, जीडीपी सुमारे 500 अब्ज अमेरिकन डॉलर्स आणि दरडोई जीडीपी 1,05,877 डॉलर्स म्हणजे अंदाजे 1,01,02,830 रुपये आहे.
छोटासा नॉर्वे इतका समृद्ध कसा?
उत्तर समुद्रातील तेल आणि गॅसचा साठा नॉर्वेच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत आहे. नॉर्वे युरोपमधील तेल आणि नैसर्गिक गॅसचा सर्वात मोठा उत्पादक व निर्यातदार देश असून पेट्रोलियम क्षेत्राचा देशाच्या एकूण निर्यातीत 40% पेक्षा जास्त वाटा आहे. नॉर्वे बहुतेक ब्रिटन, जर्मनी आणि नेदरलँड्सला इंधन निर्यात करते तर, जगातील नैसर्गिक गॅसचा तिसरा सर्वात मोठा निर्यातदार देश बनला आहे. दररोज नॉर्वे सुमारे 20 लाख बॅरल उत्पादन करतो आणि जगातील कच्च्या तेलाचा 12 वा सर्वात मोठा उत्पादक देश आहे.
नॉर्वेकडील तेलाचा भंडार
वर्ल्डोमीटरनुसार, नॉर्वेकडे अंदाजे 6.9 ते 7 ट्रिलियन बॅरलचा सिद्ध तेलसाठा असून जागतिक तेलाने समृद्ध देशाच्या यादीत 20 व्या क्रमांकावर आहे. सौदी अरेबिया किंवा रशिया यासारख्या बड्या देशांच्या तुलनेत नॉर्वेकडील तेलाचा साठा कमी असला तरीही कार्यक्षम व्यवस्थापन आणि प्रगत सागरी ड्रिलिंग तंत्रज्ञानामुळे उपलब्ध संसाधनांमधून नफा मिळण्यास मदत होते. तसेच तेल समतुल्य जोडून नॉर्वे सध्या दररोज अंदाजे 4 दशलक्ष बॅरल तेल आणि गॅसचे उत्पादन करतो.
नॉर्वेचे ऑइल फंड
नॉर्वेच्या ऊर्जा संपत्तीचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे की हा देश आपल्या उत्पन्नाचे योग्य प्रक्रारे व्यवस्थापन करतो. नॉर्वे तेल महसुलातून कमावलेला बहुतांश हिस्सा थेट सरकारी कामावर खर्च करण्याऐवजी ‘ऑइल फंड’ म्हणून ओळखला जाणारा ‘गव्हर्नमेंट पेन्शन फंड ग्लोबल’ स्थापन सुरू केला आहे, ज्याची किंमत आता जवळपास 2 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढली असून जगातील सर्वात मोठा सार्वभौम संपत्ती निधी बनला आहे.
नॉर्वेचे दरडोई उत्पन्न किती आहे?
नॉर्वेचा नाममात्र दरडोई GDP अंदाजे 1,05,877 डॉलर्स इतका आहे. तसेच स्थानिक राहणीमानाचा खर्च विचारात घेतल्या जाणाऱ्या PPP निकषानुसार अंदाजे 1,07,892 डॉलर्स इतके भरते, म्हणूनच नॉर्वे जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी आहे.
नॉर्वेच्या अर्थव्यवस्थेत बदल कसा घडला
1960 दशकाच्या उत्तराधार्थात समुद्रात इंधनाचा मोठा साठा हाती लागल्यापासून नॉर्वेच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. पश्चिम युरोपमधील पेट्रोलियमचा प्रमुख उत्पादक असलेल्या नॉर्वेला गेल्या काही दशकात वाढत्याच तेलाच्या किमतीचा फायदा मिळाला.

