Malbar Hill Woman Murder Case : नेपियन सी रोड येथील शिमला नगर वस्तीत राहणाऱ्या ५५ वर्षीय ज्योती पवार यांची बॉडी राहत्या घरी शनिवारी मलबार हिल पोलिसांना आढळली.

नेपियन सी रोड येथील शिमला नगर वस्तीत राहणाऱ्या ज्योती पवार (५५) या महिलेची बॉडी राहत्या घरी शनिवारी मलबार हिल पोलिसांना आढळली. शवविच्छेदनामध्ये ज्योती यांची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. याबाबत हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला.
आई फोन उचलत नसल्याने चिंता
घरकाम करणाऱ्या ज्योती पवार यांना त्यांचे कुटुंबीय वारंवार फोन करत होते मात्र शनिवारी कॉल्सना प्रतिसाद न दिल्याने दहिसर येथे राहणारी त्यांची कन्या एकता जाधव यांना चिंता वाटू लागली. कारण त्यांच्या आईची दिनचर्या निश्चित होती आणि त्या फोनला प्रतिसाद देत नव्हत्या.
Supreme Court : परस्त्रीसोबत हॉटेल मुक्काम अन् कॉल; व्यभिचाराचे पुरावे लपवण्यासाठी ‘प्रायव्हसी’ची ढाल नको, सुप्रीम कोर्टाने पतीला खडसावले
नातेवाईक पवारांच्या निवासस्थानी पोहोचले असता त्यांना खोली आतून बंद असल्याचे आढळले. आत प्रवेश केल्यावर, ज्योती त्यांना मृतावस्थेत आढळल्या. त्यांच्या मानेवर जखमेच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. या घटनेची माहिती मलबार हिल पोलिसांना देण्यात आली.
तपास अधिकाऱ्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, शेजाऱ्यांकडे चौकशी केली आणि गुन्ह्याच्या सुमारास चाळीत आलेल्या व्यक्तींची पडताळणी केली. तपासादरम्यान, मोहम्मद कैफ याच्या जबाबात विसंगती आढळल्याने पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला. त्यांनी त्याला या गुन्ह्याशी जोडणारे तांत्रिक आणि परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले.
Sanjay Jadhav भाजपात जाणार?, चर्चांना लावला फुलस्टॉप, म्हणाले, ‘मी कडवट शिवसैनिक’
सोन्याची चेन चोरुन पसार
पोलीस तपासादरम्यान त्यांच्या घरी भाड्याने राहणाऱ्या मोहम्मद खैफ शेख (२३) याने हा गुन्हा केल्याचे स्पष्ट झाले. पवारांची सोन्याची चेन लंपास करुन तो पळाला. हत्येनंतर शहराबाहेर पसार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या शेख यास पोलिसांनी रविवारी अटक केली. त्याने सांगितले की, त्याला अलिकडेच त्याच्या छोट्या व्यवसायात नुकसान झाले होते आणि तो आर्थिक अडचणींचा सामना करत होता. पवार गळ्यात सोन्याची चेन घालतात हे त्याला ठाऊक होते. काही कारण काढून तो पवारांच्या घरात शिरला. त्यांचा गळा दाबून जीव घेतला आणि सोन्याची चेन खेचून परागंदा झाला. या प्रकरणाचा तपास सुरू आहे, असे उपआयुक्त आर. रागसुधा यांनी सांगितले.
भावांच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्याचा खून
दुसरीकडे, ट्रॉम्बेच्या चिता कॅम्प परिसरात असलेल्या मंदिरातील आर्थिक व्यवहाराच्या वादातून शिवप्रसाद आणि हरिप्रसाद या भावांमध्ये वाद झाला. यावेळी त्याठिकाणी पोहोचलेल्या शरदकुमार याने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता दोघे भाऊ त्याच्यावरच चिडले आणि वाद घालू लागले. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. शिवप्रसाद आणि हरिप्रसाद यांनी शरदकुमारला पेव्हर ब्लॉकने मारले. यात गंभीर जखमी झालेल्या शरदकुमार याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Crime News : 23 वर्षीय शिक्षिकेच्या कलेवराला मिठी मारली, 40 वर्षीय लॅब टेक्निशियनने प्राण सोडले, प्रेमसंबंधांचा करुण अंत
गोरेगाव येथे नाल्यात बॉडी
गोरेगाव पश्चिमेला लिंक रोड असलेल्या नाल्यात रविवारी दुपारी एक शव सापडले. मयत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा व्यक्ती नाल्यात पडला, की त्याची हत्या करण्यात आली, याबाबत तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

