E20 इथेनॉल ब्लेंडिंगवरून केंद्र सरकारच्याच पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी, अॅटर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांच्या समोर आलेल्या वक्तव्यांनी सोशल मीडियावर रान उठलं. त्यातच बिहारच्या मनिष कश्यप नावाच्या युट्यूबर व्यक्तीनं धुमाकूळ घातलाय. एवढंच नाहीतर नितीन गडकरी यांचा एक जूना व्हिडिओ आणि पेट्रोलियम मंत्र्यांचा पत्रकार परिषेदेतील 20 टक्के इथेनॉलवर उत्तर देतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय. एकीकडे 20 टक्के इथेनॉलवरून प्रचंड मोठ्या टीका, आरोप होत असतानाच हे प्रकरण थेट रेसिंग कारमध्येही इथेनॉलचा वापर होतो इथपर्यंत गेलंय. तेव्हा हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे, केंद्र सरकारचे मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या उत्तरात तफावत का, व्हिडिओ व्हायरल झालेल्या मनिष कश्यपची 40 लाखांची गाडी कशामुळे खराब झाली आणि सरकारचे अॅटर्नी जनरल, अनेक वाहन उत्पादक कंपन्यांचे प्रमुख काय म्हणताय, हे सगळे मुद्दे आपण एकएक करून सविस्तर पाहणार आहोत.