Upcoming 3 New Compact SUVs: ऑटोमोबाईल कंपन्या 2025 मध्ये कॉम्पॅक्ट एसयूव्ही लाँच करण्याची तयारी करत आहेत. यामध्ये महिंद्रा, मारुती सुझुकी आणि टाटा सारख्या गाड्यांचा समावेश आहे.

जर तुम्ही नवीन एसयूव्ही शोधत असाल, तर ऑटोमोबाईल कंपन्या 2025 मध्ये कॉम्पॅक्ट एसयूव्ही लाँच करण्याची तयारी करत आहेत. यामध्ये महिंद्रा, मारुती सुझुकी आणि टाटा गाड्यांचा नावांचा समावेश आहे. येत्या काही महिन्यांत कोणत्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही लाँच होणार त्यावर एक नजर टाकूया…
महिंद्रा XUV 3XO EV
कार उत्पादक कंपनी महिंद्रा लवकरच आपल्या सर्वात लोकप्रिय SUV XUV 3XO चा इलेक्ट्रिक व्हेरिएंट लाँच करण्याची तयारी करत आहे. ही कार टेस्टिंग दरम्यान अनेक वेळा दिसली आहे. येत्या काही महिन्यांत महिंद्रा ही ईव्ही लाँच करू शकते.
महिंद्राच्या या इलेक्ट्रिक ईव्हीची खास गोष्ट म्हणजे याची रेंज. ईव्हीमध्ये पॉवरट्रेन म्हणून 34.5 किलोवॅट प्रति तास बॅटरी पॅक दिला जाईल. ही ईव्ही एका चार्जवर 400 किमीची रेंज देऊ शकते. याची एक्स-शोरूम किंमत 10 लाख 50 हजार रुपये असू शकते.
Maruti Suzuki Fronx Hybrid
भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी त्यांच्या Maruti Suzuki Fronx Hybrid चे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच करण्याची तयारी करत आहे. Fronx पहिल्यांदा 2023 मध्ये इंडियन मार्केटमध्ये लाँच करण्यात आली होती. आता ही कार नवीन फीचर आणि हायब्रिड टेक्निकसह लाँच करण्यात येणार आहे. Maruti Suzuki Fronx मध्ये, तुम्हाला 1.2 लिटर, 3 सिलेंडर झेड सिरीज इंजिन मिळण्याची अपेक्षा आहे, जे स्विफ्ट हॅचबॅकला देखील पॉवर देते. ही मोटर बॅटरी आणि इलेक्ट्रिक मोटरशी कनेक्टेड असेल.
टाटा पंच फेसलिफ्ट
टाटा पंच देखील आपले फेसलिफ्ट व्हर्जन लाँच करण्याची तयारी करत आहे. विशेष म्हणजे नवीन टाटा पंच नवीन डिझाइनमध्ये लाँच होऊ शकते. यासोबतच, नवीन फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. टाटा पंच फेसलिफ्ट कधी लाँच होईल? याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

