लक्झरी कार उत्पादक ऑडीमध्ये काम करणाऱ्यांसाठी वाईट बातमी आहे. हो, कारण ऑडीने अलीकडेच 7500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामागील कारण काय आहे? हे आजच्या बातमीमधून जाणून घेऊया…

कंपनीने त्यांच्या निवेदनात काय म्हटले आहे?
“आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत चालली आहे. स्पर्धात्मक दबाव आणि राजकीय अनिश्चितता आपल्यासमोर एक मोठे आव्हान ठरत आहे.”
कोणत्या नोकऱ्या जातील?
याचा रिसर्च एंड (R&D) मध्ये गुंतलेल्या कर्मचाऱ्यांवर सर्वात जास्त परिणाम होईल. तथापि, कंपनीने असेही म्हटले आहे की ही प्रक्रिया कोणत्याही सक्तीच्या रिडंडन्सीशिवाय पूर्ण केली जाईल, म्हणजेच कर्मचाऱ्यांना इतर ऑप्शन दिले जाऊ शकतात.
ऑडीची बचत योजना – १ अब्ज युरो कपात
ऑडी फक्त कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यापुरती मर्यादित नाही. कंपनी प्रशासकीय खर्च कमी करणे आणि नोकरशाही कमी करणे यासारखे इतर अनेक उपाय देखील राबवत आहे. या हालचालीमुळे ऑडीला दरवर्षी १ अब्ज युरो ($१.१ अब्ज) बचत होईल.
एकीकडे ऑडी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत असताना, दुसरीकडे कंपनी जर्मनीतील दोन प्रमुख प्लांट, Ingolstadt आणि Neckarsulmमध्ये ८ अब्ज युरोची गुंतवणूक करण्याची तयारी करत आहे. या गुंतवणुकीअंतर्गत एक नवीन इलेक्ट्रिक कार तयार केली जाईल.
ईव्हीमुळे ऑडीचे होत का आहे नुकसान?
2024 मध्ये ऑडी पूर्णपणे इलेक्ट्रिक कारची डिलिव्हरी 8% कमी होऊन 1,64,000 युनिट्सवर आली. विशेषतः चीनमध्ये विक्रीत 11% घट झाली, जी ऑडीच्या एकूण जागतिक विक्रीच्या 40% आहे.
बेल्जियम प्लांटही झाला बंद
इतकेच नाही तर फेब्रुवारी 2024 मध्ये ऑडीला त्यांचा बेल्जियम प्लांट बंद करावा लागला, ज्यामध्ये 3000 कर्मचारी होते आणि या प्लांटमध्ये प्रीमियम इलेक्ट्रिक वाहने तयार केली जात होती.
35000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार
ऑडीची मुख्य कंपनी फोक्सवॅगन (VW) ने आधीच घोषणा केली आहे की 2030 पर्यंत 35000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकेल. ऑडीने कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याची ही पहिलीच वेळ नाही, परंतु 7500 कर्मचाऱ्यांना काढून टाकणे हा कंपनीसाठी आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या निर्णयांपैकी एक मानला जात आहे.

