Sons’ Rights over Father’s Property: मालमत्ता, संपत्तीवरून अनेक कुटुंबात वाद होतात. मालमत्तेचा प्रकार, हस्तांतरण कसे झाले आणि इतर वारसांचे हक्क यावर वाद अवलंबून असतात. हा पैलू समजून घेतल्यास अनेक समस्या समाज सोडवल्या जाऊ शकतात आणि अशाच एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी मार्गदर्शनही केले आहे.

वडील एका मुलाच्या नावावर करू शकतात का?
अशा परिस्थतीत गाव असो वा शहर, वडील आपली सर्व जमीन किंवा मालमत्ता एका मुलाच्या नावावर करून इतर मुलांना बेघर करू शकतात का? असा प्रश्न अनेकदा उपस्थित होतो. बऱ्याच लोकांना वाटत की मालमत्ता किंवा संपत्तीच्या मालकाने घेतलेला निर्णय शेवटचा असतो, त्याला कोणी प्रश्न करू शकत नाही. मात्र, कायदेशीर चित्र थोडे वेगळे आहे. खरा फरक मालमत्तेच्या प्रकारावर अवलंबून असतो.
Crude Oil : इंधन तुटवड्याची कटकट संपणार, भारतासाठी आनंदाची बातमी; 4 महिन्यांनंतर तेलाची विहीर पुन्हा उघडली; पाहा काय फायदा होणार
म्हणजे वडिलांनी मालमत्ता स्वतःच्या वैयक्तिक उत्पन्नातून खरेदी केली आहे की वारसा हक्काने मिळाली आहे? अशाप्रकारे, दोन्ही परिस्थितींमध्ये वेगवेगळ्या प्रकारे हक्क ठरवले जातात. त्यामुळे भावना किंवा कौटुंबिक नाराजीच्या आधारावर एखाद्याचे हक्क काढून घेतले जाऊ शकतात का? याबद्दल कायदा काय सांगतो जाणून घेऊया.
सर्वप्रथम मालमत्तेचा प्रकार, हस्तांतरण कसे झाले आणि इतर वारसांचे काय हक्क आहेत कायदेशीर निर्णय अवलंबून आहे. वरील पैलू समजून घेऊनच अनेक प्रकरणांमध्ये मालमत्तेचे वाद सहजपणे सोडवले जाऊ शकतात. विशेषतः अशा प्रकरणांमध्ये, सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी आपल्या निर्णयांद्वारे घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांना समजून घेतल्यास कोणताही मालमत्तेतील गुंता न्यायालयात न जाता, सुरुवातीच्या टप्प्यावरच सोडवला जाईल.
AI Bubble Burst: भारताला मागे सारणाऱ्या कोरिया बाजारात पॅनिक सेलिंग, गुंतवणूकदार झाले अलर्ट! ‘एआय’चा फुगा फुटला; Apple च्या धक्क्याने बाजार हादरला
वडिलोपार्जित मालमत्तेवर कोणाचा किती हक्क?
वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे अशी मालमत्ता जी पिढ्यानपिढ्या हस्तांतरित केली जाते. वडिलोपार्जित संपत्तीवर मुलं आणि मुली या दोघांचाही जन्माने हिस्सा असतो तर, वडील जमिनीचे एकमेव मालक नसतात. वडिलोपार्जित मालमत्तेत वडिलांचा एकमेव मालक नसतो, म्हणजे स्वतःच्या इच्छेने संपूर्ण जमीन कोणत्याही एका मुलाच्या नावावर हस्तांतरित करू शकत नाही.
उदाहणार्थ समजा की एका कुटुंबात वडील आणि 3 मुले आहेत तर, अशा परिस्थितीत मालमत्तेचे चार हिस्से होतात. वडील स्वतःचा वाटा म्हणजे केवळ एक चतुर्थांश हिस्स्याबद्दल निर्णय घेऊ शकतात आणि उर्वरित मुलांच्या वाट्याचा निर्णय ते घेऊ शकतात. म्हणजे वडिलांनी संपूर्ण जमीन एका मुलाच्या नावे केली, तरी उर्वरित मुले न्यायालयात जाऊन आपल्या वाट्यावर दावा करू शकतात.
ITR भरण्याची तयारी, पण आधी 1 लाख रुपये वाचवणारे Section 80D समजून घेणे अत्यावश्यक, तुमचा मोठा कर वाचेल
स्व-अर्जित मालमत्तेबाबत नियम काय?
दुसरीकडे, वडिलांनी स्वतःच्या कमाईतून खरेदी केलेल्या मालमत्तेच्या मालकाला आपल्या मर्जीने संपत्तीचे वाटप करण्याचे अधिक स्वातंत्र्य असते आणि आपल्या इच्छेने एक मुलगा, मुलगी किंवा अगदी बाहेरील व्यक्तीच्या नावेही मृत्युपत्र बनवू शकतो. इतर मुलांना जन्माने कोणताही कायदेशीर हक्क नसतो पण स्व-अर्जित मालमत्तेच्या बाबतीत मृत्युपत्र बनवले नसेल आणि वडिलांचे निधन झाले, तर वारसा हक्काने मालमत्तेचे वाटप केले जाईल.
म्हणजे अशा प्रकरणात सर्व कायदेशीर वारसांमध्ये समान हिस्सा मिळेल. सोप्या शब्दात बोलायचे तर, वडिलोपार्जित मालमत्तेतील प्रत्येकाचे हक्क असते पण, स्व-अर्जित मालमत्तेमध्ये मालकाची इच्छाच ग्राह्य धरली जाते. त्यामुळे मालमत्ता स्व-अर्जित असेल, तर वडील आपल्या इच्छेनुसार कोणालाही मालमत्तेतून बाहेर काढू शकतात आणि कोणाच्याही नावावर करू शकतात.

