Headlines

LPG Gas Cylinder Prices Cut From July 1; जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच खुशखबर! मुंबईसह दिल्ली कोलकात्यात LPG स्वस्त झाला; पाहा नवीन दर काय?


LPG Gas Cylinder Price 1st July 2026: जुलै महिन्याच्या सुरुवातीला सकाळ-सकाळीच आनंदवार्ता येऊन धडकली आहे. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना मोठा दिलासा देत सरकारने 2026 मध्ये पहिल्यांदाच भारतात 19 किलो एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात केली आहे, पण घरगुती वापरासाठी असलेल्या 14.2 किलोच्या गॅस सिलिंडरची किंमत स्थिर राहिली आहे.

LPG Cylinder Price Today 1st July 2026
महिन्याच्या सुरुवातीलाच LPG स्वस्त झाला(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
LPG Cylinder Price Today: नवीन महिन्याच्या पहिल्याच दिवशी एक आनंदाची बातमी आली आहे. 1 जुलै 2026 पासून व्यावसायिक वापरासाठी असलेल्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत या वर्षातील पहिली कपात जाहीर केली आहे. आजपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 183.50 रुपयांनी स्वस्त झाला असून मुंबईत हॉटेल आणि रेस्टोरंट्समध्ये वापरला जाणारा गॅस सिलिंडर 1,788.50 रुपयांना मिळेल तर, घरगुती गॅसच्या किमती स्थिर राहिल्या आहेत.

महिन्याच्या सुरुवातीलाच LPG स्वस्त झाला

अमेरिका आणि इराण दोघे आणखी एका 60 दिवसांच्या शस्त्रसंधी करारावर सहमत झाले, ज्यामुळे भू-राजकीय तणाव कमी झाला असून एलपीजीच्या किमतींमध्ये कपात करून सरकारने सर्वसामान्यांनाही दिलासा दिला. या करारामुळे कच्च्या तेलाच्या किमती लक्षणीयरीत्या खाली आल्या आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक वाढली, जिथून जगभर जागतिक तेल आणि गॅसची सुमारे 20% वाहतूक होते.
Maharashtra TimesGold Price Crash: सोन्याचा ‘बबल’ फुटला! पिवळसर गोल्डच्या किंमतींनी शिखर गाठल्यानंतर 18 वर्षांचा विक्रम मोडला, गुंतवणूकदारांची धडधड वाढली
विशेष म्हणजे गेल्या सहामाहीत सलग दरवाढ केल्यानंतर यावर्षी 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत कपात करण्याचीही पहिलीच वेळ आहे. जानेवारीत राजधानीत व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1,691.50 रुपये होती, मात्र 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हवाई हल्ले केल्यानंतर दरात मोठी वाढ झाली.

मार्च महिन्यात व्यावसायिक सिलिंडरचा दर दोनदा वाढवला गेला. प्रामुख्याने रेस्टॉरंट्स, खाद्यपदार्थांची दुकाने आणि इतर व्यवसायांमध्ये वापरल्या जाणाऱ्या 19 किलोच्या सिलिंडरची किंमत 1 मार्च रोजी 28 रुपयांनी वाढली आणि त्यानंतर 7 मार्च रोजी त्यात आणखी 114.50 रुपयांची वाढ झाली.
Maharashtra TimesEthanol Petrol: पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्सिंग केवळ चाचपणीसाठी, पुढच्या वर्षी अहवाल येतील! सरकारी वकिलांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद
तसेच पुढील महिन्यात, मे मध्ये, तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोच्या सिलिंडरच्या किमतीत एका झटक्यात 993 रुपयांची वाढ केली आणि या सुधारणेनंतर व्यावसायिक एलपीजीची किंमत 3000 रुपयांवर पोहोचलेली. मग, 1 जून रोजी व्यावसायिक सिलिंडर आणखी 42 रुपयांनी महाग झालेला.
Maharashtra TimesShare Market : ये रे ये रे पैसा… 1 लाखाचे झाले 3.40 लाख; एथर एनर्जीच्या गुंतवणूकदारांना सहा महिन्यातच सुपरडुपर फायदा!
पेट्रोलवरील निर्यात शुल्कात वाढ
त्याचप्रमाणे, एकीकडे सरकारने LPG सिलिंडरच्या किमती कमी करून सर्वसामान्यांना आनंदाचा धक्का दिला तर दुसरीकडे, केंद्र सरकारने पेट्रोल निर्यातीवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क 1 जुलैपासून प्रति लिटर 1.5 रुपयांवरून 4 रुपयांपर्यंत वाढवले आहे. देशांतर्गत बाजाराऐवजी परदेशी बाजारात नफा कमावण्यासाठी तेल कंपन्यांनी पेट्रोलची निर्यात करू नये, या हेतूने सरकारने पाऊल उचलले आहे.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा