Headlines

‘कर्णधार म्हणून ही उत्तम सुरूवात’; कॅप्टन म्हणून पहिलीच मॅच हरणारा श्रेयस अय्यर असं का म्हणाला?


Shreyas Iyer News : कर्णधार म्हणून पहिला सामना खेळणाऱ्या श्रेयस अय्यरसाठी शुक्रवारचा दिवस खराब ठरला. ज्या संघाविरूद्ध देश कधी हरला नाही अशा संघाविरूद्ध पराभव सोपी गोष्ट नाही. सामना संपल्यावर कॅप्टन श्रेयस अय्यर ही उत्तम सुरूवात असल्याचं म्हणाला. परंतु पराभवानंतरी तो असं का म्हणाला? जाणून घ्या.

Shreyas Iyer
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि आयर्लंडमधील पहिल्या टी-२० सामन्यात पाहुण्या भारतीय संघाचा ३४ धावांनी पराभव झाला. आयर्लंडने भारताला पहिल्यांदाच हरवले असून हा वाईट विक्रम कर्णधार म्हणून श्रेयस अय्यर च्या नावावर झाला आहे. भारतीय संघाची धुरा सूर्यकुमार यादवच्या हातात असताना भारताने अडीच वर्ष एकही मालिका गमावली नव्हती. मात्र पहिल्याच सामन्यात कर्णधार म्हणून मैदानात उतरलेल्या श्रेयसला पराभवाचा सामना करावा लागला. श्रेयस असा काही पहिलाच कर्णधार नाही पण अशा संघाविरूद्ध पराभव जे याआधी आपल्याविरूद्ध कधीच जिंकू शकले नव्हते. सामना संपल्यावर प्रतिक्रिया देताना श्रेयस अय्यर काय म्हणला जाणून घ्या.

श्रेयस अय्यर काय म्हणाला?

आमच्या गोलंदाजांनी सुरूवातीला चांगली गोलंदाजी केली होती, त्यांना चांगल्या स्विंगसह लॅटरल मूव्हमेंट मिळाली आणि विकेटही घेतल्या. जबरदस्त सुरूवात झालेली पण मधल्या ओव्हरमध्ये काही गणितं चुकलीत. ग्राऊंडच्या लहान बाऊंड्रीवर मोठे फटके मारायला दिले गेले. जी सुरूवात झाली होती त्याचा विचार करता १४० धावा चांगल्या होत्या. या परिस्थितीमध्ये खेळण्याचा अनुभव चांगला होता पण कर्णधार म्हणून चांगली सुरूवात असून जे झालं ते आता विसरून जायला हवं, असं श्रेयस अय्यर म्हणाला. यावेळी बोलताना श्रेयसने हर्षित राणा आणि शिवम दुबे यांचे कौतुक केले.
Maharashtra TimesPrasidh Krishna : सर्वात महाग स्पेलनंतर ड्रॉप झालेला, तीन वर्षांनी कमबॅक, पण पुन्हा जोरदार धुलाई; प्रसिद्ध नकोशा विक्रमाचा मानकरी
श्रेयस आणि हर्षित यांनी चांगली कामगिरी केली, नव्या चेंडूने त्यांना मदत मिळत होती. शिवमने याआधी अनेकदा महत्त्वाच्या वेळी बॉलिंग केली आहे. त्यामुळे मी नेहमी त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याच्यासोबत देशांतर्गत क्रिकेट खेळलो आहे. त्यामुळे त्याच ताकद आणि कमजोरी मला माहिती आहे. दुसरीकडे हर्षित राणा याने दुखापतीनंतर चांगले प्रदर्शन केले. सामना झाल्यावर मी खेळाडूंना सांगितलं की कोणत्याही गोष्टील हलक्यात घेऊन चालत नाही, मैदानात उतरून सामना जिंकता येत नाही. त्यासाठी तु्म्हाला मेहनत घ्यावी लागते, जसं की मीआधी सांगितलं की वर्तमानामध्ये राहावं लागेल. आता मी कमबॅकची वाट पाहत असल्याचं अय्यरने सांगितलं.
Maharashtra TimesIND vs IRE : आयर्लंडकडून वर्ल्ड कप विनर भारताचा इतिहासात पहिल्यांदाच पराभव, 2 खेळाडूंनी फिरवली संपूर्ण मॅच

सामन्याचा धावता आढावा

या सामन्यामध्ये आयर्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना १८२-९ धावा केल्या होत्या. कॅप्टन टकर याने ३६ चेंडूत ५० धावांची खेळी केली. यामध्ये त्याने ५ चौकार आणि २ षटकार मारले होते. तर गॅरेथ डेलानी ४९ धावांची महत्त्वाची खेळी केली. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ १४८ धावांवर ऑल आऊट झाला. भारताकडून अभिषेक शर्मा याने केलेली ५० धावांची खेळी व्यर्थ गेली. दोन सामन्यांच्या मालिकेत आयर्लंड संघाने १-० ने आघाडी घेतली आहे.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा