गेल्या वर्षभरात सातत्याने वाढणाऱ्या किमतींनंतर ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला. त्यामुळे, लग्न किंवा गुंतवणुकीसाठी खरेदी करणाऱ्यांसाठी ही एक चांगली संधी मानली जात आहे.
Gas Cylinder Price Cut 1st July 2026: महिन्याच्या सुरुवातीलाच खुशखबर! मुंबईसह दिल्ली कोलकात्यात LPG स्वस्त झाला; पाहा नवीन दर काय?
सोने-चांदीच्या दरात दबाव कायम
बुधवार, 1 जुलै रोजी MCX वर सुरुवातीच्या व्यवहारांमध्ये सोने आणि चांदीच्या दरात लक्षणीय घसरण नोंदवली गेली. मजबूत अमेरिकी डॉलर, मजबूत ट्रेझरी यील्ड्स आणि अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर वाढीच्या वाढत्या अपेक्षांमुळे मौल्यवान धातूंवर दबाव कायम राहिला.
जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी सकाळी 9.42 वाजता सोन्याचा ऑगस्ट वायदा 0.94% किंवा 1336 रुपयांनी घसरून 1.41 लाखांच्या आसपास व्यवहार करत होता, तर चांदीची किंमत 4,600 रुपये किंवा 2.12 टक्के घसरणीसह 2.22 लाखांवर व्यवहार कर आहे.
Ethanol Petrol: पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्सिंग केवळ चाचपणीसाठी, पुढच्या वर्षी अहवाल येतील! सरकारी वकिलांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद
सोने-चांदीच्या किमतीत महिन्याभरात मोठी घसरण
MCX नुसार देशांतर्गत बाजारात जून महिन्यातस्पॉट सोन्याचे दर 15,100 रुपये म्हणजे जवळपास 10% घसरून प्रति 10 ग्रॅम 1,40,864 रुपयांवर कमी झाले. तसेच चांदीची किंमत 38,250 रुपये म्हणजे जवळपास 15% घसरून 30 जून रोजी 2,25,125 रुपये प्रति किलोवर स्थिरावलेले.
जगभरातील अस्थिर महागाई आणि त्यामुळे होणारी अमेरिकी फेड रिझर्व्हची व्याजदर वाढीची शक्यता या चिंतेमुळे जून महिन्यात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. त्याचवेळी, अमेरिका आणि इराण यांनी संघर्ष थांबवून तोडगा काढण्यासाठी चर्चा करण्यास सहमती दर्शवल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीही घसरल्या.
महागाईमुळे फेड – अमेरिकेची मध्यवर्ती बँक – व्याजदर वाढवण्याच्या शक्यतेच्या चिंतेमुळे अमेरिकेत सोन्याच्या दरांनी सलग चौथ्या महिन्यात घसरण नोंदवली. तसेच जून महिन्यात 2013 नंतरची सर्वात मोठी तिमाही घट नोंदवली गेली.फेडरल रिझर्व्ह यावर्षी 3 वेळा व्याजदर वाढवण्याची शक्यता वर्तवली जात असून यामुळे डॉलरमध्ये सततच्या वाढीमुळे सोन्याच्या दरांवर दबाव पडत आहे.
फेड यावर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डिसेंबरमध्ये व्याजदर वाढवण्याची बहुतांश व्यापाऱ्यांना अपेक्षित असून अमेरिकेच्या फेडरल ओपन मार्केट कमिटीची – FOMC – पुढील बैठक 28-29 जुलै रोजी होणार आहे. पण त्याआधी फेडच्या व्याजदर धोरणाच्या दिशेबाबत नवीन संकेतांसाठी आता सर्वांचे लक्ष जून महिन्यातील ADP रोजगार आकडेवारी आणि गुरुवारी येणाऱ्या नॉन-फार्म पेरोल आकडेवारीवर लागून असेल.
(Disclaimer : सोन्या-चांदीमधील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते, तुम्ही सोने किंवा चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर आधी तुमच्या भरवशाच्या आर्थिक तज्ञाचा सल्ला अवश्य घ्या.)

