Headlines

‘मला विश्वासच बसत नाहीये भारताने वैभवला खेळवलं नाही’; माजी कर्णधाराचं गंभीर-श्रेयसकडे बोट


Vaibhav Sooryavanshi News : आयर्लंडविरूद्धच्या पहिल्याच टी-२० सामन्यामध्ये भारताचा ३४ धावांनी पराभव झाला. आयर्लंडने भारताचा केलेला पहिला पराभव ठरलाय. या सामन्यात वैभवला खेळवलं नसल्याने टीका होताना दिसत आहे. अशातच माजी कर्णधारानेही यावरून निशाणा साधला.

Shreyas Iyer Gautam Gambhir Vaibhav Sooryavanshi
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतील विजेतेपद राखल्यानंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला पराभवास सामोरे जावे लागले. आयर्लंडविरुद्धच्या या सामन्यात शुक्रवारी गोलंदाजी आणि फलंदाजीत चांगली सुरुवात केल्यावरही भारतास ३४ धावांनी एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला, आयर्लंडने यामुळे प्रथमच भारताविरुद्धची टी-२० लढत जिंकली. या सामन्यामध्ये वैभव सूर्यवंशी याला न खेळवल्याने चाहत्यांनी निराशा झाली. अशातच याचाच धागा पकडत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन याने भारतीय टीम मॅनेजमेंटवर टीका केलीय.

मला विश्वास बसत नाहीये की त्यांनी वैभव सूर्यवंशी याची निवड केली नाही, जो आताचा टी-२० मध्ये जगातील जबरदस्त खेळाडू असल्याचं मायकेल वॉन याने म्हटलं आहे. यासंदर्भात मायकेल वॉन यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे. एकंदरितच सर्वांना वाटलं होतं की वैभव आंतरराष्ट्रीय पदार्पण करणार पण तसे काही झाले नाही.
Maharashtra TimesIND vs IRE : ‘कर्णधार म्हणून ही उत्तम सुरूवात’; कॅप्टन म्हणून पहिलीच मॅच हरणारा श्रेयस अय्यर असं का म्हणाला?
भारताने वर्ल्ड कप विजेतेपदानंतर आपला कर्णधार बदलला होता. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या आयर्लंडला आपल्या संघात प्रमुख गोलंदाज नाहीत हे सतावत होते. त्यामुळे भारतीय धावांची आतषबाजी करतील अशीच अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्यातच भारताने आयर्लंडची ४ बाद ५१ अशी सुरुवात केली. त्यामुळे सामना पूर्ण ४० षटकांचा होईल का हाही प्रश्न होता. मात्र, आयर्लंडने १८२ धावांची मजल मारून सामना सोपा नसणार याचे संकेत दिले. भारताच्या वर्ल्ड कप विजेतेपदात मोलाची कामगिरी केलेल्या अभिषेक शर्माने धडाकेबाज सुरुवात केली. मात्र, तीन भारतीय फलंदाज पॉवरप्लेमध्ये परतले. अभिषेकच्या हल्ल्यामुळे भारताने ६८ धावांचा चोप सहा षटकांत दिला होता. मात्र, अभिषेक परतल्यावर भारताचा धावांचा संघर्ष सुरू झाला. अवघ्या २३ चेंडूंत अर्धशतक केलेल्या भारताने त्यानंतरच्या ५० धावांसाठी ४९ चेंडू घेतले.
Maharashtra TimesPrasidh Krishna : सर्वात महाग स्पेलनंतर ड्रॉप झालेला, तीन वर्षांनी कमबॅक, पण पुन्हा जोरदार धुलाई; प्रसिद्ध नकोशा विक्रमाचा मानकरी
अभिषेक आणि शिवम दुबे सोडल्यास एकही भारतीय फलंदाज पंचविशी पार करू शकला नाही. संजू सॅमसन, ईशान किशन आणि नवा कर्णधार श्रेयस अय्यर या तिघांनी मिळून नऊच धावा केल्या. निम्मा संघ १०.२ षटकांत ९० धावांत परतल्यामुळे निकाल स्पष्ट झाला. शिवम दुबेच्या प्रतिकारामुळे भारतास दीडशेनजीक मजल मारल्याचे समाधान लाभले. ‘आमचा मारा सुरुवातीस भेदक होता. मात्र त्यानंतर योजना अंमलात आणू शकलो नाही. त्यांना स्ट्रेट फटके मारण्याची संधी दिली. मैदानाचे एकूण स्वरुप पाहता १४० धावांचे लक्ष्य पाठलाग करण्यास योग्य होते. या सामन्यातील चुकांची पुनरावृत्ती टाळण्याचा नक्कीच प्रयत्न असेल’, असे श्रेयस अय्यर म्हणाला.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा