आजकाल कार चालवणे ही काय आश्चर्याची गोष्ट नाही. आजच्या काळात कार चालवणे ही काळाची गरज बनली आहे. परंतू जर तुम्ही कार चालवायला घाबरत असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला परफेक्ट कार चालवण्याचा काही सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्या तुम्ही नीट फॉलो केल्यावर अवघ्या 10 दिवसांमध्ये कार शिकाल.

योग्य ट्रेनर निवडा
शहर मोठे असो किंवा लहान आता सगळीकडे ड्रायव्हिंग लर्निंग स्कूल आहेत. जर तुम्हाला कार शिकायची असेल तर तुम्ही सर्वात आधी योग्य ट्रेनर निवडा जो तुम्हाला गाडी चालवायचे सर्व नियम नीट सांगेल. तुम्ही कोणत्याही ड्रायव्हिंग स्कूलमध्ये 10-15 दिवसांचा किंवा एक महिन्याचा ड्रायव्हिंग कोर्स करू शकता, ज्यामध्ये थ्योरीटिकल आणि प्रॅक्टिकल दोन्ही माहिती दिली जाईल.
कारचे बेसिक कंट्रोल्स आधी समजून घेणे आवश्यक
तुम्ही युट्यूबवर कारचे काही बेसिक कंट्रोल्स समजून घेऊ शकतात. स्टीअरिंग व्हील, अॅक्सिलरेटर, ब्रेक, क्लच आणि गियर यांसारखी कंट्रोल्स नीट समजून घ्या. कारचे कंट्रोल काय करते आणि ते कसे वापरायचे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
ड्रायव्हिंग करताना शांत राहा आणि मन स्थिर ठेवा
माणूस कोणत्याही कामात परिपूर्ण नसतो. ड्रायव्हिंग ही अशी गोष्ट आहे ज्याबद्दल लोकांना दररोज नवीन माहिती मिळते. जे पहिल्यांदाच गाडी चालवायला शिकत आहेत त्यांच्याकडून सुरुवातीला चुका होणे स्वाभाविक आहे. अशा परिस्थितीत कार चालवताना शांत राहा आणि तुमचे मन स्थिर ठेवा. कार चालवताना घाई करू नका.
सुरक्षित ठिकाणी प्रॅक्टिस करा
सुरवातीला गाडी चालवताना रहदारीचे ठिकाण निवडू नका तर सुरक्षित ठिकणी गाडीची प्रॅक्टिस करा. जेणेकरुन तुम्हाला भिती वाटणार नाही. तसेच ड्रायव्हिंग करताना एक्सीलरेटर, ब्रेक, क्लच आणि स्टीअरिंग व्हीलकडे नीट लक्ष द्या.
नियमांचे पालन करा आणि सुरक्षित रहा
गाडी चालवताना वाहतुकीचे नियम पाळणे बंधनकारक आहे. नेहमी सीट बेल्ट लावा, स्पीड कमी ठेवा आणि वाहनांपासून आणि समोरून किंवा मागून येणाऱ्या गाड्यांपासून अंतर ठेवा. सुरक्षित वाहन चालवणे केवळ तुमच्या सुरक्षिततेसाठीच नाही तर इतरांच्या सुरक्षिततेसाठी देखील महत्त्वाचे आहे. जर तुम्ही या सर्व गोष्टी लक्षात ठेवल्या तर काही दिवसांत तुम्ही गाडी चांगली चालवू शकाल.

