Share Market Today Update 1 July 2026: बुधवार, 1 जुलै रोजी, KPIT टेक्नॉलॉजीजचा शेअर झरझर पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला आहे. स्टॉकने दिवसाच्या व्यवहार दरम्यान 15% लोअर सर्किट हिट केले. इतकेच नाही, तर JPMorgan ने कंपनीचे रेटिंग कमी केले असून लक्ष्य किंमतही कमी केली. यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास कमी झाला असून भविष्यातही स्टॉकमध्ये चढ-उतार सुरू राहण्याची शक्यता आहे.

IT स्टॉक लोअर सर्किटला आपटला
ऑटोमोबाइल क्षेत्राला सॉफ्टवेअर आणि इंजिनिअरिंग सेवा पुरवणाऱ्या KPIT टेक्नॉलॉजीजच्या शेअरमध्ये बुधवारी जोरदार पडझड झाली. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कंपनीने व्यवसाय कमकुवत राहण्याचा अंदाज वर्तवल्यानंतर गुंतवणूकदार स्टॉक विकून पळ काढून बाहेर पडू लागले. बुधवार, 1 जुलै रोजी, व्यवहार सत्रादरम्यान स्टॉक 15% लोअर सर्किटला आपटला, ज्यामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली.
Gold Silver Prices July 1: सराफा बाजाराचे कधी अप, कधी डाऊन सुरूच; महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी धडाम, किती झालं स्वस्त?
1 जुलै 2026 रोजी सकाळी KPIT टेक्नॉलॉजीजचा शेअर 671.55 रुपयांच्या मागील बंद भावाच्या तुलनेत 604.40 रुपयांवर ओपनिंग केली, तर दुपारी 12.20 वाजता 107.35 रुपये म्हणजे 15.99% टक्के घसरून 564.20 रुपयांच्या आसपास व्यवहार करत होता. बुधवारी देशांतर्गत बाजाराच्या सुरुवातीला स्टॉकवर केवळ विक्रीच्या लाल रंगाचे वर्चस्व पाहायाला मिळाले असून कोणीही हा स्टॉक खरेदी करायला तयार नव्हता. यामुळे स्टॉकला 10% लोअर सर्किट लागला, पण लोअर सर्किटनंतर ट्रेडिंग अक्षरशः थांबले आणि गुंतवणूकदार शेअर्स विकू शकले नाही. बाजाराने कंपनीचा इशारा खूप गांभीर्याने घेतल्याचे यावरून दिसून आले.
मात्र, कंपनीच्या कमजोर अंदाजाचा परिणाम केवळ शेअर्सच्या किमतीवरच नाही, तर गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनावरही झाला. ब्रोकरेज फर्म JPMorgam ने देखील कंपनीचे रेटिंग कमी केले आणि लक्ष्य किमतीही कात्री लावली. परिणामी बाजारात कंपनीच्या कामगिरीबद्दल नकारात्मक भावना पसरली.
Gas Cylinder Price Cut 1st July 2026: महिन्याच्या सुरुवातीलाच खुशखबर! मुंबईसह दिल्ली कोलकात्यात LPG स्वस्त झाला; पाहा नवीन दर काय?
पहिल्या सहामाहीत कमकुवत महसूल
एप्रिल-जून 2026 च्या तिमाहीत महसूल आणि नफा दबावाखाली राहण्याबाबत कंपनीने एक्सचेंजला कळवले. याशिवाय, दुसऱ्या तिमाहीत व्यवसायात सुधारणा अपेक्षित नाही. यामुळे बऱ्याच काळानंतर कंपनीच्या कमाईत घट होण्याची ही पहिलीच वेळ असेल. युरोपसह अनेक प्रमुख बाजारांमध्ये ऑटोमोबाइल क्षेत्रातील मंद मागणीचा कंपनीवर परिणाम होत असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे असून काही प्रमुख ग्राहकांनी आपला खर्च कमी केला आणि अनेक प्रकल्पांची गतीही मंदावली आहे. परिणामी कंपनीने आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या सहामाहीसाठी सावध भूमिका घेतली आहे.
Gold Price Crash: सोन्याचा ‘बबल’ फुटला! पिवळसर गोल्डच्या किंमतींनी शिखर गाठल्यानंतर 18 वर्षांचा विक्रम मोडला, गुंतवणूकदारांची धडधड वाढली
रेटिंग डाउनग्रेडमुळे विक्रीत वाढ
त्याचवेळी, कंपनीच्या कमकुवत अंदाजानंतर जेपी मॉर्गनने मूल्यांकन सुधारले, स्टॉकचे रेटिंग ‘’न्यूट्रल’वरून ‘अंडरवेट’ करून लक्ष्य किमतीलाही कात्री लावली. कंपनीची रिकव्हरी अपेक्षेपेक्षा मंद असण्याचा ब्रोकरेजचा अंदाज आहे.
(Disclaimer : वरील तपशील केवळ माहितीसाठी आहे, गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते, त्यामुळे कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या विश्वासू व्यक्तीचा सल्ला घ्या. तुमच्या नफा किंवा तोट्यास लेखक किंवा महाराष्ट्र टाइम्स व्यवस्थापन जबाबदार राहणार नाही.)

