president daniel noboa declared a national holiday : फिफा वर्ल्ड कप सुरू असून थरारा सामने पाहायला मिळत आहेत. गुरूवारी इक्वेडोरने जर्मनीला पराभूत करत सामना जिंकला. या विजयानंतर इक्वेडोरचे अध्यक्ष डॅनियल नाबोआ यांनी राष्ट्रीय सुटी जाहीर केलीय.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : आव्हान खडतर असते, तेव्हाच कणखर वाटचाल करता येते. इक्वेडोरने वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेत जर्मनीविरुद्ध गुरुवारी रात्री ‘ई’ गटात झालेल्या लढतीत नेमके हेच दाखवले. स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांत एकच गोल केलेल्या इक्वेडोरने चार वेळच्या विजेत्या जर्मनीविरुद्ध २-१ने मात करून अविस्मरणीय विजय मिळवला. जर्मनीला पराभूत करून इक्वेडोरने वर्ल्ड कपच्या बाद फेरीत प्रवेश केला. त्यामुळे इक्वेडोरमध्ये आनंदाची लाट उसळली. हा जल्लोष इक्वेडोरचे अध्यक्ष डॅनियल नाबोआ यांनी शुक्रवारी राष्ट्रीय सुटी जाहीर करून जास्तच द्विगुणित केला.
इक्वेडोरचा पहिल्या दोन सामन्यांतएकच गुण होता. त्यातच चार वेळचे विजेते, चार वेळचे उपविजेते, एकूण १३वेळा उपांत्य फेरी गाठलेल्या जर्मनीला पराभूत केले तरच आशा होती. हे कमीच की काय म्हणून लेरॉय सॅन याने दुसऱ्याच मिनिटांस गोल करीत इक्वेडोरवरील साखळीत बाद होण्याचे संकट गडद केले. या स्पर्धेत गोलचे ३९ प्रयत्न अपयशी ठरलेल्या इक्वेडोरने अखेर स्पर्धेतील गोलांचा भोपळा फोडला. FIFA World Cup Trophy : फुटबॉल विश्वचषकाची किंमत 4 वर्षात तब्बल अडीच पटीने वाढली, 6 किलोहून अधिक सोन्याचे मढलेली ट्रॉफी निल्सन अँगुलो याच्या किकवर जर्मनीचा गोलरक्षक मॅन्यूएल नेऊर चकला आणि स्टेडियममध्ये पिवळ्या लाटांना उधाण आले. गोंझालो प्लॅटा याने १३ मिनिटे शिल्लक असताना केलेला गोल जबरदस्त होता. नेऊर चेंडूवर ताबा घेणार असे वाटत असतानाच गोंझालोने अक्षरक्षः काही क्षण अगोदर चेंडूला किक दिली. त्यानंतर इक्वेडोरच्या पाठीराख्यांनी सुरू केलेला आनंदोत्सव सामना संपल्यानंतरही कितीतरी वेळ सुरू होता. आमच्या संघातील प्रत्येकजण देशासाठी सर्व काही द्यायला तयार आहे, हेच पाठीराख्यांना दाखवून द्यायचे होते, या प्लॅटाच्या टिपणीचा प्रत्यय आला. Lionel Messi : मेस्सीने रचला इतिहास! फिफा वर्ल्ड कपमध्ये असा विक्रम करणारा जगातला एकमेव खेळाडू
खेळ आकड्यांचा
९ सलग वर्ल्ड कप लढतीत जर्मनीस गोल स्वीकारावा लागला आहे. २०१४च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनास हरवल्यानंतर प्रत्येक लढतीत. यापूर्वी हे १९३४ ते १९५४ दरम्यान.
१९९८ नंतर प्रथमच जर्मनीचा सामन्यातील पहिला गोल केल्यानंतर दुसऱ्यांदा पराभव. या कालावधीत २५ विजय आणि दोन बरोबरीही.
२०१३ नंतर प्रथमच इक्वेडोरचा युरोपिय प्रतिस्पध्र्थ्यांविरुद्ध विजय. इक्वेडोरचा गेल्या २२ स्पर्धात्मक लढतीत एकच पराभव. त्यात १२ विजय आणि ९ बरोबरी
२ पिछाडीस पडल्यानंतर इक्वेडोरने वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवण्याची वेळ. यापूर्वी २०१४मध्ये होंडुरासविरुद्ध.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा