नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगर परिषदेची निवडणूक ही सध्या चर्चेत आहे. या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी एकूण 6 उमेदवार आहेत. त्यापैकी 4 उमेदवार हे मुस्लिम समाजातील आहेत. त्यामुळे मतांचे धुव्रीकरण झाले तर कुणाला फायदा होणार? ते पाहणं आता महत्त्वाचं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
महेश पाटील, नंदुरबार : शहादा पालिकेसाठी भाजपा आणि जनता विकास आघाडी यांच्यात प्रमुख लढत बघायला मिळत असताना आणखी दोन पक्षांनी या निवडणुकीत चुरस वाढवली आहे. उपमुखयमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस तसेच एमआयएमने उमेदवार दिल्याने आव्हान उभे राहिले आहे. नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी 4 मुस्लिम उमेदवार दिल्याने ते किती मतांवर प्रभाव टाकतात? त्यावर शहराचा नगराध्यक्ष ठरणार आहे. असे असले तरी नगराध्यक्ष पदाची निवडणूक बहुरंगी होणार आहे. दरम्यान, पालिकेच्या निवडणुकीत दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या नेत्यांच्या पत्नी नगरसेवक पदासाठी एकमेकांसमोर उभ्या असल्याने या लढतीकडे जिल्हा वासियांचे लक्ष लागून आहे.
शहादा नगरपालिकेसाठी भाजपातर्फे मकरंद पाटील, जनता विकास आघाडीतर्फे अभिजित पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खाटीक मकसूद शेख गफ्फार, एआयएमआयएम पक्षाचे पिंजारी साजिद रहीम, तर दोन अपक्ष उमेदवार पिंजारी शेख आरिफ शेख मासुम आणि बेलदार मेहमूद शेख अहमद असे 6 उमेदवार नगराध्यक्षपदासाठी तर नगरसेवकांच्या २९ जागांसाठी ११९ उमेदवार मैदानात उतरले आहे.
नगराध्यक्षपदाचे दोन प्रबळ दावेदार पारंपरिक विरोधक भाजपचे मकरंद पाटील आणि जनता विकास आघाडीचे अभिजित पाटील यांच्यात प्रमुख लढत होत असल्याचे वाटत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे खाटीक मकसूद शेख गफ्फार आणि एआयएमआयएम पक्षाचे पिंजारी साजिद रहीम यांच्या उमेदवारीमुळे शहाद्यातील राजकीय गणित बदलली आहेत. तसेच चार मुस्लिम उमेदवार कोणाच्या मतांवर किती प्रभाव टाकतात? की त्यातीलच कुणी मागील निवडणुकीप्रमाणे प्रभावी ठरतो, यावरून या निवडणुकीचे अंतिम भवितव्य ठरणार आहे.
सुमारे 58 हजार 972 मतदार असून, त्यात 38 टक्के अर्थात म्हणजेच सुमारे 23 हजार मुस्लीम समुदायाचे मतदार आहेत. मुस्लीम समुदायाचे मतदान निवडणुकीत मोठा प्रभाव टाकणारे आणि निर्णायक ठरत आले आहेत. 2016 च्या निवडणुकीत मुस्लीम समुदायाचे मतदान पारंपरिकरीत्या काँग्रेस पक्षाकडे वळणार आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा विजय होईल असे वाटत होते. मात्र तसे न होता, त्यावेळी कमालीचे धार्मिक ध्रुवीकरण होऊन हे मतदान एकगठ्ठा नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार शेख जहीर शेख मुशीर यांना गेल्याने काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा पराभव होऊन काँग्रेस पक्ष तीन नंबरवर फेकला गेला होता. तर भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला होता.
मुस्लीम समुदायाचे अपक्ष उमेदवार शेख जहीर शेख यांचा यावेळी निसटता पराभव झाला असला तरी ते दोन नंबरवर राहिले होते. यंदाच्या निवडणुकीत भाजप आणि जनता विकास आघाडीच्या उमेदवारांसमोर मुस्लिम समुदायाचे चार उमेदवार उभे ठाकले आहेत. हे चारही उमेदवार कोणत्या उमेदवारावर प्रभाव टाकणार? की मागील निवडणुकीप्रमाणे धार्मिक ध्रुवीकरण होऊन हे मतदान एकगठ्ठा कुणाला तरी जाणार? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. राज्यात सत्तेत, पण नंदुरबारमध्ये महायुतीत कमालीचा राजकीय संघर्ष, नगर परिषद निवडणुकीत 2 आमदारांची प्रतिष्ठा पणाला एक गोष्ट मात्र निश्चित आहे की, शहादाच्या नगराध्यक्षपदाच्या प्रतिष्ठेच्या आणि चुरशीच्या लढतीत मुस्लीम समुदायाची मते प्रभावी ठरणार, हे मात्र निश्चित आहे. ही मते यंदा कोणाच्या पारड्यात जाणार, याबाबत शहरात चर्चा आहे. दरम्यान शिंदे शिवसेनेच्या नेत्यांनी जनता विकास आघाडीला पाठिंबा दिला आहे.
दिग्गज नेत्यांच्या पत्नीच्या लढतीकडे जिल्हावासियांचे लक्ष
शहादा नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १३ – अ या महिला ओबीसी आरक्षित जागेसाठीची लढत शहरात महत्त्वाची ठरणार आहे. या जागेसाठी भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मकरंद पाटील यांच्या पत्नी माधवी मकरंद पाटील आणि जनता विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभिजित पाटील यांच्या पत्नी प्रीती अभिजित पाटील हे आमनेसामने लढत देत आहेत. नगराध्यक्षपदाएवढी महत्त्वाची ही लढत ठरणार आहे. या लढतीकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा