Headlines

Nashik shirdi railway doubling land acquisition; नाशिक-शिर्डी रेल्वे मार्ग अपडेट, ‘या’ 34 गावांमध्ये भूसंपादनाला गती, शेतकऱ्यांना कसा मिळणार मोबदला?


Nashik Shirdi Railway Update: नाशिक-शिर्डी रेल्वे मार्गावर मोठी हालचाल सुरू झाली आहे. रेल्वे दुहेरीकरणामुळे प्रवास अधिक सुकर होणार आहे. ३४ गावांमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया वेगात सुरू असून तुमचं गाव यादीत आहे का?

nashik-shirdi-railway-doubling-land-acquisition
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नाशिक: नाशिक ते साईनगर शिर्डी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण प्रकल्पाने आता वेग पकडला आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी जिल्ह्यातील ३४ गावांमधील जमिनी संपादित केल्या जाणार असून प्रशासनाने भूसंपादन प्रक्रिया गतीमान केली आहे. त्यामुळे भविष्यात नाशिक-शिर्डीदरम्यानचा रेल्वे प्रवास अधिक जलद आणि सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मध्य रेल्वेने सादर केलेल्या प्रस्तावानुसार नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भूसंपादन शाखेने आवश्यक कार्यवाही सुरू केली आहे. या प्रक्रियेसाठी सक्षम प्राधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून २५ मे रोजी अधिकृत आदेशही जारी करण्यात आले आहेत. नाशिक आणि सिन्नर तालुक्यातील गावांच्या भूसंपादनाची जबाबदारी निफाडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे.

या प्रकल्पासाठी निवडलेल्या ३४ गावांपैकी २३ गावे सिन्नर तालुक्यातील तर ११ गावे नाशिक तालुक्यातील आहेत. भूसंपादनाचे प्रत्यक्ष काम उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) क्रमांक १, नाशिक यांच्या नियंत्रणाखाली पार पडणार आहे.

कोणत्या गावांचा समावेश?

सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी, कुंदेवाडी माजरे, वडझिरे, दातली, पाथरे खुर्द, दुसुंगवाडी, खोपडी खुर्द, पांगरी खुर्द, पांगरी बु., मलढोण, खंबाळे, सिन्नर, फुलेनगर, ब्राम्हणवाडे, मुसळगाव, देशवंडी, जायगाव, वावी, सायाळे, पाटपिंप्री, बारागावपिंप्री, भोकणी आणि सुंदरपूर या गावांचा समावेश करण्यात आला आहे.

Maharashtra TimesTukaram Mundhe यांचं जनतेकडून प्रचंड कौतुक, पण बदलीचीही कुजबुज; मराठा आंदोलक जरांगे म्हणाले, ‘सरकारने त्या भानगडीत पडूच नये’

तर नाशिक तालुक्यातील विहितगाव, बेलतगव्हाण, चांदगिरी, जाखोरी, देवळाली, चेहेडी बु., संसरी, मोहगाव, बाभळेश्वर, पंचक आणि चांडेगाव या गावांमधील जमिनीही संपादित केल्या जाणार आहेत.

रेडीरेकनरनुसार मिळणार मोबदला

दरम्यान, सर्वात मोठा प्रश्न उरतो की ज्यांच्या जमीनी यासाठी रेल्वेकडून संपादन केल्या जाणार आहेत, त्यांना नेमका काय मोबदला मिळणार? तर रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पासाठी जमीन संपादन करताना २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार शेतकऱ्यांना मोबदला दिला जाणार आहे. रेडीरेकनर दराचा आधार घेत भरपाई निश्चित केली जाणार असून संपूर्ण प्रक्रिया रेल्वे कायद्यानुसार राबवली जाईल.

दरम्यान, सोमवारनंतर गावनिहाय संपादित करण्यात येणाऱ्या गट क्रमांकांची यादी जाहीर केली जाणार असल्याची माहिती निफाडचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी दिली आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा