Headlines

वनप्लसचा मोठा धमाका! OnePlus 15R चे दमदार 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिएंट लाँच, पहा किंमत । Maharashtra Times


वनप्लसने आपल्या ग्राहकांसाठी OnePlus 15R चा नवीन आणि शक्तिशाली व्हेरिएंट बाजारात आणला आहे. गेल्या वर्षी हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये लाँच झाला होता. मात्र, आता कंपनीने यामध्ये अपग्रेड करत तब्बल 16GB रॅम आणि 512 GB अंतर्गत स्टोरेज असणारे नवीन मॉडेल लाँच केले असून याची किंमत आणि फीचर्स सध्या चर्चेत आहेत. चला तर मग जाणून घेऊया.

OnePlus 15R । Maharashtra Times
सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)
स्मार्टफोन प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. वनप्लस कंपनीने आपल्या लोकप्रिय OnePlus 15R सीरिजचा विस्तार केला आहे. ग्राहकांना आता अधिक स्पीड आणि भरपूर स्पेस मिळावी म्हणून थेट 16 GB रॅमसह 512GB स्टोरेजचा नवीन पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. नवीन व्हेरिएंटच्या किमतीसोबतच त्याचे फिचर्स ग्राहकांना आकर्षित करत आहेत.

OnePlus 15R ला 2025 मध्ये दोन रॅम आणि स्टोरेज पर्यायांमध्ये लाँच करण्यात आले होते, ज्यामध्ये टॉप मॉडेलमध्ये 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज होते. आता कंपनीने या फ्लॅगशिप फोनचे नवीन 16 GB रॅम व्हेरिएंट लाँच केले आहे, हे 16 GB मॉडेल 512 GB स्टोरेजसह उपलब्ध असेल. एक गोष्ट जी आम्हाला सुरुवातीला स्पष्ट करायची आहे ती म्हणजे फोनच्या उर्वरित फीचर्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

OnePlus 15R 16GB किंमत

वनप्लसच्या या स्मार्टफोनच्या 16 GB रॅम आणि 512 GB व्हेरिएंटचा टॉप व्हेरिएंट 61,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. या फोनच्या 12 GB रॅम आणि 256 GB व्हेरिएंटच्या बेस व्हेरिएंटची किंमत 54,999 रुपये, 12 GB रॅम आणि 512 GB व्हेरिएंटची किंमत 59,999 रुपये आहे. या फोनवर निवडक बँक कार्डद्वारे (एचडीएफसी, कोटक, आयडीएफसी कार्ड) 3000 रुपयांची सूट मिळत आहे.

OnePlus 15R मध्ये होणार स्पर्धा

कंपनीच्या साइटशिवाय हा फोन ॲमेझॉनवर मिंट ब्रीज, चारकोल ब्लॅक आणि इलेक्ट्रिक व्हायोलेट रंगात उपलब्ध असेल. या किंमतीत वनप्लसचा हा फोन Xiaomi 14 CIVI, OPPO Reno13 Pro 5G आणि Samsung Galaxy S25 FE 5G सारख्या स्मार्टफोन्सना कडवी टक्कर देतो.

वनप्लस 15आर चे फीचर्स

  • डिस्प्ले: या डिव्हाइसमध्ये 165Hz रिफ्रेश रेटसह 6.8-इंच डिस्प्ले आहे. हा फोन 1.5K AMOLED डिस्प्ले आणि 1800 nits पर्यंत ब्राइटनेससह येतो.
  • चिपसेट: फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे, हा चिपसेट हाय-एंड परफॉर्मन्स देण्यासाठी ओळखला जातो.
  • कॅमेरा: फोन 4K रिझोल्यूशनवर 120fps व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो. सेल्फीसाठी 50 मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि 32 मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर आहे. या हँडसेटमध्ये क्लियर बर्स्ट, अल्ट्रा क्लियर मोड आणि क्लियर नाईट इंजिन यासारखे ॲडव्हान्स फीचर्स देण्यात आले आहेत.
  • बॅटरी: 7400mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 80W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
शुभम कुलकर्णी

लेखकाबद्दलशुभम कुलकर्णीशुभम कुलकर्णी जवळपास 6 वर्षांपासून मराठी माध्यमांमध्ये काम करतोय. आकाशवाणी (छत्रपती संभाजीनगर) पासून माध्यम क्षेत्रात कामाला सुरुवात केली. एका मुखपत्रासह मुंबईतील नामांकित मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बुलेटिन प्रोड्यूसर’ म्हणून जबाबदारी सांभाळली. शुभमला राजधानी दिल्लीतही बातमीवर संस्कार करण्याची संधी मिळाली. राजकारण, व्यापार-उद्योग, क्रीडा, तंत्रज्ञान, ऑटो या विषयावर लिहायला त्याला आवडतं. निसर्गाच्या सानिध्यात बसायला, फावल्या वेळेत चित्रपट, वेब सिरीज पाहाण्याचा शुभमचा छंद आहे.आणखी वाचा