Satara Mahabaleshwar Activa Car Accident while Hospital to Meet Father 29 Year Old Youth Dies; हॉस्पिटलमध्ये वडिलांना भेटायला जाताना काळाची झडप, कमावत्या लेकाचा अपघाती मृत्यू; दीड वर्षाच्या लेकराचं पितृछत्र हरपलं
Satara Mahabaleshwar Activa Car Accident while Hospital to Meet Father 29 Year Old Youth Dies; हॉस्पिटलमध्ये वडिलांना भेटायला जाताना काळाची झडप, कमावत्या लेकाचा अपघाती मृत्यू; दीड वर्षाच्या लेकराचं पितृछत्र हरपलं
Satara Accident News : राज्यात अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. अशातच सातारामध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
वडिलांना भेटायला जाताना अपघात तरुणाचा अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुधीर पाटील, सातारा : सातारा-महाबळेश्वर मार्गावर भरधाव कार आणि ॲक्टिव्हाची समोरासमोर धडक होऊन दुचाकीवरील तरूण जागीच ठार झाला. दीपक उर्फ नाना आनंदा कांबळे (वय २९, रा. डांगरेघर, ता. जावली), असं मृताचं नाव आहे. सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आपल्या वडिलांना भेटण्यासाठी जात असतानाच काळाने त्याच्यावर झडप घातली. वाहनावर चालक म्हणून काम करत होता.
दीपक हा वाहनांवर चालक म्हणून काम करत होता. दोन वर्षांपूर्वीच त्याचं लग्न झालं होतं. त्याला दीड वर्षांचा मुलगा आहे. तो कुटुंबातील कमावता तरूण होता. त्याच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ, पत्नी आणि दीड वर्षांचा मुलगा, असा परिवार आहे. या घटनेमुळे डांगरेघर परिसरावर शोककाळा पसरली. मृताचा भाऊ संदीप कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेढा पोलीस ठाण्यात कार चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.
दाम्पत्य अपघातात जखमी
दरम्यान, सातारा मेढा मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन आणखी एक भीषण अपघात झाला. त्यामध्ये सखाराम गणपत रिंगे (वय ६५) आणि पत्नी लक्ष्मी सखाराम रिंगे (रा. मांघर, ता. महाबळेश्वर) जखमी झाले. साताऱ्यातील रूग्णालयात औषधोपचार घेऊन ते महाबळेश्वरकडे जात असताना वाघेश्वर (ता. जावली) गावच्या हद्दीत हा अपघात झाला. Kolhapur News : माझ्या बाळाची चिरफाड करु नका; अन्वीकचा दारात खेळताना मृत्यू, आरती ताईंनी पोस्टमार्टम थांबवलं, जुळी बहीण कावरीबावरी या अपघातात सखाराम रिंगे यांच्या डोक्याला व डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून अपघातानंतर दुचाकीस्वाराने घटनास्थळावरून पलायन केले. दोन्ही अपघातांचा तपास सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गंगावणे आणि हवालदार झोरे करत आहेत.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा