Headlines

Dhule Shirpur Taluka Attempt to Kidnap and Kill a Minor Boy Suspected of Stealing Tractor Lights; ट्रॅक्टरचे लाईट चोरल्याचा संशय, अल्पवयीन मुलाचं अपहरण, लोखंडी बैलगाड्याला बांधलं, खालून जाळ केला अन्…; महाराष्ट्र हादरला


Dhule Crime : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच धुळे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

Dhule Crime
शिरपूर मुलाचं अपहरण करुन मारहाण(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अजय गर्दे, धुळे : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात खळबळजनक घटना घडली आहे. ट्रॅक्टरचे लाईट चोरल्याचा संशय घेऊन 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलाचं अपहरण करून त्याला लोखंडी बैलगाडीला बांधून मारहाण करत खालून जाळ केल्याची घटना घडली. या घटनेत आगीच्या चटक्यांनी गंभीररित्या भाजलेल्या या मुलावर आता शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

शिरपूर-जळोद रस्त्यालगतच्या भामपूर शेती शिवारात वीटभट्टीजवळ घडलेल्या या प्रकारामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. शिरपूर तालुक्यातील सातपूर येथील अल्पवयीन पीडित मुलगा अचानक गायब झाल्यानंतर कुटुंबियांनी त्याची सगळीकडे शोधाशोध केली. त्यानंतर समोर आलेल्या माहितीने सर्वांना मोठा धक्का बसला.

Maharashtra TimesRaigad Crime : डोक्यापासून छातीपर्यंत जखमा, रक्ताने माखलेल्या लाकडी पट्ट्या; हिराबाई जोशी मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासा

हिमांशूच्या वडिलांनी दिली फिर्याद

शिरपूर तालुक्यातील भामपूर येथील चिंतामण उर्फ चिंतू साहेबराव कोळी आणि सचिन उर्फ डॉक्टर साहेबराव कोळी यांनी हिमांशू यास जबरदस्तीने गाडीवर बसवून त्याचं अपहरण केलं. यानंतर त्याला शिरपूर-जळोद रस्त्यावरून शेतातील वीटभट्टी परिसरात नेण्यात आलं. तेथे त्याला मारहाण करून एका लोखंडी बैलगाडीला बांधण्यात आलं. या क्रूरतेनंतर दोन्ही संशयितांनी बैलगाडीच्या खाली जाळ केला. गाडीखाली लावण्यात आलेल्या आगीमुळे लोखंडी पत्रा तापला आणि हिमांशू गंभीररित्या भाजला आहे.

Maharashtra TimesNanded Crime : भरगच्च पगार, पण तरीही पैशांचा मोह; लाच घेताना महिला नायब तहसीलदारास अटक

‘ट्रॅक्टरचे लाईट माझ्याकडे आहेत, मी आणून देतो’

हिमांशूने ‘ट्रॅक्टरचे लाईट माझ्याकडे आहेत, मी आणून देतो’, असं खोटं सांगत गयावया केली, आणि दोघांच्या ताब्यातून स्वतःची सुटका करून घेतली. घरी परतल्यावर आईला त्याने संपूर्ण घटना सांगितल्यावर हा प्रकार उघडकीस आला’, अशी माहिती त्याचे मामा महेश पवार यांनी दिली. अल्पवयीन मुलांवर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिरपूर शहर पोलिसांनी चिंतामण उर्फ चिंटू भाऊसाहेब कोळी आणि सचिन उर्फ डॉक्टर साहेबराव कोळी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून दोघांविरुद्ध अपहरण, मारहाण आणि हिमांशू याचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपांसह बालसंरक्षण कायद्यानुसार गंभीर गुन्हे दाखल करणार आहेत.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा