Headlines

New Tax Regime ITR Filing 2026 Benefits; नव्या आयकर प्रणालीत मिळतात 5 टॅक्स बेनिफिट; तुम्ही वाचवू शकता कर, ITR भरण्यापूर्वी जाणून घ्या कसा आणि कुठे


New vs Old Tax Regime for Salaried Class: प्रत्येक करदात्याला सरकारने नवीन करप्रणाली आणि जुन्या करप्रणालीत निवडणं करण्याचा पर्याय दिला आहे. नव्या करप्रणालीत कमी कर दर आणि अनेक महत्त्वपूर्ण कर सवलती व वजावटी मिळतात. त्यामुळे तुम्ही अद्यापही आयटीआर दाखल केलेला नसेल तर नवीन करप्रणाली अंतर्गत असलेल्या 5 प्रमुख फायद्यांविषयी जाणून घेऊया.

New Tax Regime ITR Filing Benefits
नव्या आयकर प्रणालीत मिळतात 5 टॅक्स बेनिफिट; ITR भरण्यापूर्वी जाणून घ्या कसा आणि कुठे(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
Income Tax Filing: आयकर विवरणपत्र दाखल करण्याचा हंगाम सुरू झाला आहे. नोकरदार करदात्यांना आर्थिक वर्ष 2025-26 साठी विवरणपत्र भरण्यासाठी 31 जुलै 2026 मुदत असून आयटीआर केवळ दाखल करण्याचे दस्तऐवज नाही तर गृहकर्ज, क्रेडिट कार्ड, वैयक्तिक कर्ज आणि व्हिसा यासारख्या अनेक महत्त्वाच्या कामांसाठी उत्पन्नाचा पुरावा म्हणूनही उपयोगी पडते.

नवीन करप्रणालीचे 5 प्रमुख फायदे

करदात्यांना जुन्या आणि नवीन कर प्रणालींपैकी निवडण्याचा पर्याय दिला गेला आहे. नवीन करप्रणालीत कमी कर दरांसोबतच अनेक महत्त्वपूर्ण कर सवलती आणि वाजवटींचा फायदाही मिळतो. त्यामुळे आयटीआर दाखल करण्याआधी करदात्यांना नवीन करप्रणालीअंतर्गत मिळणाऱ्या 5 प्रमुख फायद्यांविषयी माहिती असली पाहिजे जेणेकरून योग्य पर्याय निवडून जास्तीत जास्त कर बचत होऊ शकेल.
Maharashtra Times900 रुपयांचा शेअर 2800 वर; देशातील नामचीन म्युच्युअल फंड कंपनीच्या IPO पूर्वी GMP मध्ये गुंतवणूकदारांना मिळतोय तगडा रिस्पॉन्स
75,000 रुपयांची मानक वजावट
नवीन करप्रणालीत करदात्यांना कोणतीही गुंतवणूक आणि कागदपत्रांशिवाय 75000 रुपयांच्या मानक वाजवटीचा फायदा मिळतो. उदाहणार्थ एखाद्याचा वार्षिक पगार 14 लाख रुपये असेल तर 75000 रुपये मानक वाजवटीसह करपात्र उत्पन्न 13.25 लाख रुपये होईल.

NPS मधील नियोक्त्याच्या योगदानावर कर कपात
एखादा नियोक्ता कर्मचाऱ्याच्या NPS टियर-1 खात्यात योगदान देत असेल, तर आयकर कायद्याच्या कलम 80CCD(2) अंतर्गत मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या 14% पर्यंत कर कपातीचा दावा केला जाऊ शकतो, जो मानक कपातीव्यतिरिक्त आहे. मात्र ईपीएफ, एनपीएस आणि रिटायरमेंट फंडमधील नियोक्त्याचे एकूण योगदान वार्षिक 7.5 लाखांपेक्षा जास्त नसावे.
Maharashtra TimesTrump Tariff Warning: किती खोटं बोलणार ट्रम्प? व्यापार करार निरर्थक, 100% टॅरिफ लादणार! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
कौटुंबिक निवृत्ती वेतनावर सवलत
एखाद्याला कौटुंबिक निवृत्तीवेतन मिळत असेल तर, करदात्याला नव्या करप्रणालीत कर सवलतीचा फायदा मिळतो. यामध्ये 25,000 रुपये किंवा एकूण फॅमिली पेन्शनच्या एक-तृतीयांश (यापैकी जी रक्कम कमी असेल) इतकी कपात मिळू शकते.
Maharashtra TimesProperty Rules: वडिलांनी एकाच मुलाला मालमत्ता दिल्यास दुसऱ्या मुला-मुलीचा हक्क राहतो का? हे कितपत कायदेशीर, नियम काय सांगतो
भाड्याने दिलेल्या घराच्या होम लोनवर कपात
एखाद्या करदात्याने होम लोन घेतले आहे आणि भाड्याने दिले असेल तर, नव्या कर प्रणालीत कर्जाच्या व्याजावर कर कपातीचा दावा केला जाऊ शकतो. या प्रकरणात व्याज कपातीची कोणतीही कमाल मर्यादा नाही.

अग्निवीर कॉर्पस फंडातील योगदानावर पूर्ण कपात
आयकर कायद्याच्या कलम 80CCH अंतर्गत अग्निवीर कॉर्पस फंडातील योगदानावर अग्निवीरांना 100% टॅक्समध्ये सूट मिळण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आयकर विवरणपत्र भरण्यापूर्वी Tax Benefits बद्दल जाणून घेतल्यास पगारदार कर्मचाऱ्यांना कर विवरणपत्राचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यास आणि कपातींचा पुरेपूर फायदा घेणे शक्य होऊ शकते.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा