Crime News: दीड वर्षांपूर्वी विवाह बंधनात अडकलेल्या २३ वर्षीय तरुणाची चटका लावणारा शेवट झाला आहे. तिच्या अकाली निधनानं कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. डोहाळेजेवणाची चर्चा सुरू असताना घडलेला प्रकार सुष्मिताच्या मृत्यूस कारण ठरला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
हैदाराबाद: पतीच्या संशयी स्वभावाला कंटाळून गर्भवती पत्नीनं आयुष्य संपवलं. पती कायम महिलेवर संशय घ्यायचा. ती गर्भवती राहिल्यावरही त्याच्या मनात शंकाकुशंका येत राहिल्या. त्यानं पत्नीकडे बाळाच्या डीएनए चाचणीचा हट्ट धरला. पत्नीनं पतीला समजवण्याचे बरेच प्रयत्न केले. पण तिचे प्रयत्न तोकडे पडले. यानंतर तिनं जीवन प्रवास संपवला. मृत तरुणी २३ वर्षांची होती. ही दुर्दैवी घटना तेलंगणाच्या मेडक जिल्ह्यात घडली.
मृत तरुणीची ओळख पटली आहे. तिचं नाव सुष्मिता असं आहे. जवळपास १८ महिन्यांपूर्वी तिचा विवाह झाला होता. अलादुर्गमधील गादिपेड्डापूर गावात राहणाऱ्या अभिलाष सोबत तिनं लग्नगाठ बांधली होती. मृत्यूसमयी सुष्मिता ५ महिन्यांची गर्भवती होती. अभिलाष त्याच्या पत्नीला शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायचा, तिचा छळ करायचा, तिच्या चारित्र्यावर शंका घ्यायचा, असं सुष्मिताची आई जनाबाईनं पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. Crime News: नंबर ब्लॉक केल्यावर GFचं अपहरण, सतत एकच धमकी; मग कॅबमध्ये स्फोट, तरुणाचा थरकाप उडवणारा शेवट अभिलाषची आई शशिरेखादेखील सुष्मिताला त्रास द्यायची, असाही आरोप जनाबाईंनी पोलीस तक्रारीत केला आहे. ‘२३ जूनला आम्ही सुष्मिताच्या डोहाळेजेवणाच्या तयारीबद्दल बोलण्यासाठी तिच्या सासरी गेलो होतो. त्यावेळी चर्चा करताना वाद झाला. तेव्हा अभिलाषनं सुष्मिताच्या पोटात असलेल्या बाळाची डीएनए चाचणी करण्याचा विषय काढला. मीच त्या बाळाचा बाप आहे, ते मला जाणून घ्यायचंय, असं अभिलाष म्हणाला. त्यावरुन वाद झाला. तेव्हा गावातील वृद्धांनी, जुन्याजाणत्यांनी वाद सोडवला आणि प्रकरण काहीसं निवळलं,’ असा घटनाक्रम सुष्मिता यांनी कथन केला.
दोन दिवसांनंतर, २५ जूनला सुष्मिता तिच्या सासरी मृतावस्थेत सापडली. सासरच्यांकडून सातत्यानं होणारा अपमान, छळ यांना कंटाळून सुष्मितानं जीव दिल्याचा गंभीर आरोप तिच्या कुटुंबानं केला आहे. कुटुंबानं दिलेल्या तक्रारीच्या आधारे अलादुर्ग पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५ आणि १०८ च्या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी अभिलाष आणि त्याच्या आईला अटक केली आहे. त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. Groom Dies During Wedding: सप्तपदीआधी नवरदेवाचा करुण अंत; पोटदुखीनं तब्येत अचानक बिघडली; गावात दबक्या आवाजात वेगळीच चर्चा या घटनेनं परिसरात संतापाची लाट उसळली. या प्रकरणी दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सुष्मिताची आई जनाबाई यांनी केली. ‘आपण आपल्या लेकीचं लग्न ज्या तरुणा सोबत करुन देत आहोत, तो पुढे जाऊन कसा वागेल, याची कल्पना करणं अवघड आहे. पण सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊन, मुलाची आणि त्याच्या कुटुंबाची नीट चौकशी करुन, मगच लेकीचं लग्न लावून द्या,’ असं भावनिक आवाहन जनाबाईंनी केलं.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.
पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.
मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.
‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.
टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.
लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.
लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.
२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.
शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा