Headlines

Beed 25 Year Old Youth Died After Unknown Vehicle Hit Him; भरधाव वाहनाची धडक अन् आई-वडिलांचा एकुलता एक लेक गेला, संपूर्ण गावावर शोककळा


सुनील जाधव, बीड: धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मांजरसुंबा घाटात सोमवारी रात्री एका भीषण अपघाताची घटना घडली. एका भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला. या अपघातात 25 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरातून एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातग्रस्त तरुण आपल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे.

चैतन्य व्यंकटेश तांबोळकर (वय 25, राहणार पाचपिंपळा, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव) हा तरुण सोमवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून (क्रमांक : एमएच 25 एवाय 7075) बीडहून धाराशिवच्या दिशेने निघाला होता. तो मांजरसुंबा घाटातील एका वळणावर आला असता, समोरून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला समोरासमोर भीषण धडक दिली.

Maharashtra TimesCrime News: नाकात नळी, ऑक्सिजनवर असलेली विवाहित गर्लफ्रेंड मृत्यूपूर्वी म्हणाली – याला काही करु नका तो..

हा अपघात इतका भीषण होता की, धडक बसल्यानंतर दुचाकीचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. चैतन्य याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. रात्रीची वेळ असल्याने आणि घाटात अंधार असल्याने सुरुवातीला अपघात नेमका कशामुळे झाला हे समजले नाही, मात्र धडकेचा आवाज ऐकून आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) बालाजी ढगारे यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला सारून आणि पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली.

मृत चैतन्य तांबोळकर हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच पाचपिंपळा गावावर शोककळा पसरली आहे. तरुणाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. धडक देऊन पळून गेलेल्या अज्ञात वाहनचालकाचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे अधिक तपास पोलीस करत आहेत.

नुपूर उप्पल

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर विकास उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत.गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहे. राष्ट्रीय, गुन्हेगारी, राजकीय, हटके स्टोरीज या विषयांचं लिखाण करण्यात हातखंडा आहे. घटनेचं विश्लेषणात्मक लिखाण करण्यात रस. गेल्या 9 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून यापूर्वी टीव्ही ९ मराठी, साममध्ये कामाचा अनुभव आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझमचं शिक्षण घेतलं आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत