ॲप्सचे सबस्क्रिप्शन किंवा रिचार्जसाठी आपण अनेकदा ‘ऑटो पे’ पर्याय चालू करतो. परंतु फ्री ट्रायल संपल्यावर किंवा सेवा वापरणे बंद केल्यावरही खात्यातून स्वयंचलितपणे (ऑटो पे) पैसे कट होत राहतात. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी गुगल पे, फोनपे आणि पेटीएमवरून अवघ्या काही सेकंदांत ऑटो पे बंद करण्याची सोपी ऑनलाईन तांत्रिक प्रोसेस. चला तर मग जाणून घेऊया.

सुरुवातीला हा पर्याय सोयीचा वाटत असला, तरी अनेकदा आपण फ्री ट्रायल संपल्यावर किंवा सबस्क्रिप्शन वापरणे बंद केल्यावरही ते ‘ऑटो पे’ बंद करायला विसरतो. परिणामी, दर महिन्याला आपल्या नकळत बँक खात्यातून पैसे कट होत राहतात आणि मोठे आर्थिक नुकसान होते. जर तुम्हालाही या समस्येपासून सुटका हवी असेल, तर गुगल पे, फोनपे आणि पेटीएम वरून अवघ्या काही सेकंदांत ‘ऑटो पे’ कसे बंद करावे, याची ही सोपी ऑनलाईन प्रोसेस.
1. PhonePe वरून ‘ऑटो पे’ कसे बंद करावे?
- सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये PhonePe ॲप ओपन करा.
- डाव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला असलेल्या तुमच्या ‘Profile’ आयकॉनवर क्लिक करा.
- खाली स्क्रोल केल्यावर ‘Payment Settings’ अंतर्गत तुम्हाला ‘AutoPay’ चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- येथे तुम्हाला सुरू असलेल्या सर्व ऑटो पे सबस्क्रिप्शन्सची यादी दिसेल. ज्या सेवेचे ऑटो पे बंद करायचे आहे, त्यावर क्लिक करा.
- स्क्रीनच्या तळाशी असलेल्या ‘Remove AutoPay’ या लाल बटनवर क्लिक करा. तुमचा युपीआय पिन (UPI PIN) टाका. तुमची ऑटो पे सिस्टीम कायमची बंद होईल.
2. Google Pay वरून ‘ऑटो पे’ कसे बंद करावे?
- गुगल पे ॲप ओपन करून उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यातील तुमच्या ‘Profile’ फोटोवर क्लिक करा.
- खाली स्क्रोल करा आणि ‘Autopay’ किंवा ‘Mandates’ या पर्यायावर क्लिक करा.
- येथे सुरू असलेले ॲक्टिव्ह मँडेट्स (Active Mandates) दिसतील. जे बंद करायचे आहे ते निवडा.
- ‘Cancel Mandate’ किंवा ‘Pause’ वर क्लिक करा. तुमचा युपीआय पिन टाकून प्रक्रियेची पुष्टी (Confirm) करा.
3. Paytm वरून ‘ऑटो पे’ कसे बंद करावे?
- पेटीएम ॲप ओपन करा आणि प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करा.
- ‘UPI & Payment Settings’ हा पर्याय निवडा.
- खाली स्क्रोल करून ‘UPI Automatic Payments’ वर क्लिक करा.
- सुरू असलेले सबस्क्रिप्शन निवडून ‘Remove’ किंवा ‘Cancel’ बटन दाबा.

